‘व्हीपीके’कडून उसाला ३,००० रुपयांचा विक्रमी भाव

उमरी : उमरी परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक सुबकता वाढवण्यासाठी व्हीपीके उद्योग समूहाने मोठा निर्णय घेतला आहे. मार्च महिन्यात गाळपासाठी येणाऱ्या सभासद शेतकऱ्यांच्या उसाला आता प्रतिटन ३,००० रुपये इतका उच्चांकी भाव दिला जाणार असल्याची घोषणा समूहाचे चेअरमन मारोतराव कवळे गुरुजी यांनी केली आहे.…











