Tag sugarcane

‘व्हीएसआय’ म्हणजे पांढरा हत्ती : राजू शेट्टी

RAJU SHETTI

पाडेगाव केंद्रालाही AI अनुदान देण्याची मागणी पुणे : कृषी विद्यापीठाच्या पाडेगाव ऊस संशोधन केंद्राद्वारे एआय तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शासनाने प्रयत्न करायला हवा. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) पांढरा हत्ती बनला आहे. ऊस संशोधनात पाडेगावचा सिंहाचा वाटा असून, त्यांनी अनेक उसाच्या जाती…

शेतकऱ्यांनी पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे : पवार

Sharad Pawar

पुणे : सध्या पाण्याची चिंताजनक परिस्थिती असली, तरी शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक वापर आणि नियोजन करण्याची गरज असल्याचे  मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले. ते मंगळवारी (दि. २२)  बारामतीत पत्रकारांशी बोलत होते. ‘एआय’संदर्भात ते म्हणाले की, शेतीमध्ये या तंत्रज्ञानाच्या वापरासाठी…

साखर व्यापाऱ्याची कार फोडल्याप्रकरणी गुन्हा

सांगली : खंडणी देण्यास नकार दिल्याच्या रागातून आणि एका जुन्या व्यवहारातील खटल्याच्या वादातून एका साखर व्यापाऱ्याच्या कारची आज्ञाताने तोडफोड केली आहे. ही घटना येथील संजयनगरमध्ये नुकतीच घडली. याप्रकरणी विक्रम दिनकर पाटील (वय ४०) या साखर व्यापाऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल केली.…

‘एआय’ उसाला वरदान ठरणार : बिपीन कोल्हे

Bipin Kolhe

अहिल्यानगर : ‘एआय’ तंत्रज्ञानामुळे सर्व क्षेत्रांत मोठे फेरबदल होण्याची भीती व्यक्त केली जाते. त्यावर जगभर मंथन सुरू आहे. मात्र, ‘एआय’ तंत्रज्ञान ऊस पिकाला वरदान ठरणार आहे. उत्पादन खर्च आणि पाण्याचा वापर कमी आणि उत्पादनात भरीव वाढ अशी किमया या तंत्रज्ञानाने…

‘उसासह सहा पिकांत ‘एआय’चा वापर करणार’

Ajit Pawar

पुणे : राज्यात यापुढे उसासह कापूस, सोयाबीन, भात, कांदा आणि मका शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्र वापरण्याचे निश्चित करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ‘एआय’ तंत्र विस्ताराची पुढील दिशा ठरविण्यासाठी सोमवारी येथील साखर संकुलमधील ‘व्हीएसआय’च्या सभागृहात बैठक आयोजित केली…

गाळपात पुणे जिल्ह्यातील पाच कारखाने टॉपवर

पुणे : प्रतिकूलतेतही राज्यात दहा लाख टनांपेक्षा अधिकचे गाळप करण्यात पुणे जिल्ह्यातील पाच, कोल्हापूर चार, तर अहिल्यानगर, सोलापूर, सातारा जिल्ह्यातील प्रत्येकी एका कारखान्याचा समावेश आहे. खासगी कारखान्यांनी गाळप जास्त केले. मात्र, सहकारी कारखान्यांनी साखर उतारा जास्त मिळवत साखरनिर्मितीत आघाडी घेतली.…

कर्नाटक, तमिळनाडूत विशेष हंगामाची शक्यता

पुणे : दक्षिण कर्नाटकात व तमिळनाडूत उसाच्या वाढत्या लागवडीमुळे पुरेशा प्रमाणात ऊस उपलब्ध आहे, त्यामुळे या दोन्ही राज्यांतील काही कारखाने आपला विशेष हंगाम जुलै ते सप्टेंबर या कालावधीत सुरू करण्याची शक्यता इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (इस्मा) व्यक्त केली…

खुलताबाद तालुक्यात तीन एकरांतील ऊस जळून खाक

burned Sugarcane field

खुलताबाद : तालुक्यातील टाकळी राजेराय येथील काटशिवरी भागात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत जवळपास तीन एकरांतील ऊस, पाइप, ठिबक आणि दोन हजारांवर बांबू जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी (ता. १५) सकाळी दहाच्या सुमारास घडली. काटशिवरी भागात अय्युब मेहताब पटेल, गुलाब हुसेन…

हार्वेस्टर चालकांच्या बिलातून पाचटाची वजावट नको – साखर आयुक्त

Sakhar Sankul

पुणे : ऊस तोडणी यंत्रधारकांच्या बिलामधून पाचटाच्या अनुषंगाने कोणतीही वजावट करू नये, अशी महत्त्वपूर्ण सूचना साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांनी परिपत्रकाच्या माध्यमातून सर्व साखर कारखान्यांना दिली आहे. ऊस तोडणी यंत्राने (हार्वेस्टर) तोडलेल्या उसाच्या वजनातून सरसकट ४.५ टक्के पाचटाचे वजन वजावट…

ऊसउत्पादक, मजुरांच्या हितरक्षणासाठी सर्वसमावेशक कायद्याचा मसूदा तयार करा: अजित पवार

मुंबई : राज्यातील साखर कारखाने, ऊस वाहतूकदार, ऊसतोडणी मुकादम, उसतोडणी मजूर, यांच्यात उचलीच्या (अग्रिम) रकमेवरुन होणारी कोट्यवधी रुपयांची फसवणूक टळावी, त्यामुळे होणारे गुन्हे थांबावेत, ऊसउत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, ऊसतोडणी मजूरांसह सर्वांच्या हक्कांचे रक्षण व्हावे, एकाही घटकावर अन्याय होऊ…

Select Language »