ऊर्मिला

नववधू ऊर्मिला अयोध्येस महाली पातली
हातावर मेहंदी, डोळ्यात स्वप्ने घेऊन आली
दारातच तो कठोर वेदनेचा निरोप आला
लक्ष्मण निघाला, रामसीते सवे वनवासाला ||१||
म्हणे लक्ष्मण, प्रिये, दे निरोप हसून मजला
ती म्हणाली प्राणनाथा, सामोरे जावे कर्तव्याला
गालात हसून, अश्रू लपवित निरोप दिला
एकाच शब्दाने चौदा वर्षांचा त्याग स्वीकारला ||२||
म्हणे निद्रादेवीला, माझ्या पतीची झोप दे मला
ते जागून वनात, रात्रंदिवस सेवा करेन
सौमित्राच्या डोळ्यांवरची झोपही स्वतः घेईन
ऊर्मिला इथे झोपेन, त्यांचे स्वप्न पुरे करेन ||३||
महालात राहूनही तिने वनवास भोगला
एकटेपणा, पति विरहही हसून सोसला
कोणी न पातले सांत्वनाला, तरी धीर धरला
धन्याची वाट पाहतांना काळही गहिवरला ||४||
जानकीचा त्याग जगाने डोळे भरून पाहिला
जगात ऊर्मिलेचा विरह पडद्याआड निमाला
न कळत विश्वाचा, तीआदर्श होऊन राहिली
रामायणात अबोल ऊर्मिला त्यागमूर्ती झाली ||५||
इंजिनिअर कवी -वाळू आहेर नाशिक






