माळेगाव कारखान्याच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करू : सुनेत्रा पवार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखाना देशातील अग्रगण्य कारखाना बनवण्याचे दिवंगत अजित पवार यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संचालक आणि शेतकरी सभासदांना सोबत घेऊन काम करू, असे कारखान्याच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी सांगितले. कारखान्याच्या ७१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या बोलत होत्या.

कारखान्याचा वारसा आणि परंपरा जपत सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले जाईल. कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प पूर्ण करण्यासाठीही प्रयत्न केले जातील, असे पवार यांनी सांगितले. सोमेश्वर कारखान्याच्या तुलनेत माळेगावचा अंतिम ऊसदर कमी असला, तरी ३,६५० रुपये हा राज्यातील सर्वाधिक दरांपैकी एक असल्याचे त्यांनी नमूद केले. पुढील वर्षी माळेगावचा अंतिम दर सर्वाधिक असेल, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी संचालक मंडळाला केले.

सुमारे साडेपाच तास चाललेल्या सभेत सभासदांनी ऊसदर, पहिली उचल, वाढलेला उत्पादन खर्च आणि कारखान्याच्या कारभाराबाबत प्रश्न उपस्थित केले. सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे देत त्यांच्या हितासाठी पारदर्शकपणे काम करण्याची ग्वाही पवार यांनी दिली.

सभेत काही किरकोळ वाद झाले; मात्र सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली आणि सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »