ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

आवडल्यास ही बातमी शेअर करा

अहिल्‍यानगर : नेवासा-शेवगाव राज्यमार्गावर शुक्रवारी रात्री झालेल्या एका भीषण अपघातात २१ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात कुकाणा येथील बाजार समितीसमोर रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडला.

महेश मानशाराम कर्डिले (रा. जेऊर हैबती, ता. नेवासा) असे मृत तरुणाचे नाव आहे. या अपघातात त्याचा मित्र संकेट बद्रिनाथ बडे (२७) हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ऊस वाहतूक करणाऱ्या एका वाहनाला दुचाकीची जोरात धडक बसल्याने हा अपघात झाला. शनिवारी दुपारी मृतावर जेऊर हैबती येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास कुकाणा पोलीस चौकीचे हेड कॉन्स्टेबल अनिल बडे करत आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »