‘ओंकार शुगर’मध्ये मोठी भरती!

विविध तांत्रिक पदांसाठी ‘वॉक-इन इंटरव्ह्यू’ची घोषणा; अनुभवी उमेदवारांना संधी
अहिल्यानगर : जिल्ह्यातील देवदैठाण येथील ओंकार शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज प्रा. लि. या साखर कारखान्यात विविध तांत्रिक पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर करण्यात आली आहे. कारखान्याची दररोज सुमारे ३५०० मेट्रिक टन उस गाळप क्षमता असून, उत्पादन वाढीच्या पार्श्वभूमीवर ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
या भरतीसाठी किमान ५ ते ७ वर्षांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. इच्छुकांनी स्वतःची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, सध्याचा व अपेक्षित पगार आणि संपर्क तपशीलासह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुलाखतीचा तपशील:
रविवार, ०९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत कारखाना साईटवर ‘वॉक-इन इंटरव्ह्यू’ आयोजित करण्यात आला आहे.
उपलब्ध पदे:
इंजिनिअरिंग विभागात असिस्टंट इंजिनिअर, इन्स्ट्रुमेंट इंजिनिअर, फोरमॅन, फिटर, बॉयलर ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन, वायरमन यांसारख्या पदांचा समावेश आहे.
उत्पादन विभागात केमिस्ट, लॅब इन्चार्ज, सुपरवायझर, शुगर हाऊस क्लर्क यांसारख्या पदांसाठी भरती होणार आहे. तसेच सुरक्षा विभागात सुरक्षा सुपरवायझर आणि सुरक्षा रक्षकांचीही आवश्यकता आहे.
या भरतीमुळे स्थानिक तरुणांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळेत उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्यवस्थापनाने केले आहे.



