Category Headlines

imp happenings to be treated as headlines

‘व्हीएसआय’ साखर परिषद १२ जानेवारीपासून

VSI International Sugar Conference

पुणे : येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये (व्हीएसआय) तिसरी आंतरराष्ट्रीय साखर परिषद १२ ते १४ जानेवारी २०२४ या कालावधीत होत आहे. या निमित्ताने जगभरातील साखर क्षेत्रातील प्रगतीची अनुभूती मिळणार आहे. या काळात भव्य साखर प्रदर्शनाचेही आयोजन केले आहे. साखर उद्योगासाठी राज्यात…

जतन करा खोडवे, सुटेल संकटाचे कोडे!

Khodva sugarcane

ही दोन वर्षे साखर उद्योगासाठी काळजीची! संकटावर मात करण्यासाठी असे करा नियोजन महाराष्ट्रामध्ये यावर्षी (२०२३-२४) हवामान बदलामुळे सुमारे १५ ते २० टक्के पाऊस कमी झाला आहे. विशेषतः साखर पट्ट्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतेक सर्वच जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे…

“Good Governance” महत्वाचा

MD panel

(एमडी पॅनल असावे की नसावे यावर नेहमीच चर्चा झडत असतात, साहेबराव खामकर यांनी त्याला पुन्हा मुद्देसूदपणे तोंड फोडले. त्यांच्या लेखावर डी. एम. रासकर यांनी अत्यंत मार्मिक अभिप्राय दिला आहे.) प्रथमतः मी श्री. साहेबराव खामकर पाटील यांनी हा विषय प्रामाणिकपणे उपस्थित…

एमडी पॅनल पद्धतीचा फेरविचार आवश्यक

MD panel

सहकारी साखर कारखान्यांमध्ये कार्यकारी संचालक (एमडी) पदासाठी पूर्वीपासून चालत आलेली कार्यकारी संचालक पदासाठी आवश्यक असलेली पॅनल पध्दत सध्या कालबाह्य ठरत आहे. त्या मुळे त्यामध्ये कालानुरूप बदल करून पॅनल (नामतालिका) पध्दत बंद करून या पदाचे नेमणुकीसाठी नवीन निकष तयार करून नेमणुकीचे…

बिग ब्रेकिंग : रेणुका शुगर विनाकपात रू. ३३०० एकरकमी देणार

panchganga sugar

कोल्हापूर : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना चालवणाऱ्या रेणुका शुगर्सने शनिवारी तातडीने परिपत्रक जारी करून, रू. ३३०० प्रति टन विनाकपात आणि तेही एकरकमी देणार असल्याचे जाहीर केले आहे. परिपत्रकात म्हटले आहे – सर्व ऊस पुरवठादार शेतकरी बंधू व…

पंजाबात ऊस दर जाणार ४००० वर, शेतकऱ्यांचे आंदोलन मागे

PANJAB FARMERS

‘गुड न्यूज’ लवकरच : मुख्यमंत्री चंडीगड : जालंधरमधील रेल्वे ट्रॅक आणि राष्ट्रीय महामार्गावर उसाच्या दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले. येत्या काही दिवसांत “चांगली बातमी” (गुड न्यूज) दिली जाईल, असे…

नववी शिकलेल्याला बनवले मुख्य शेती अधिकारी

Nagawade Sugar Mill

नागवडे कारखान्याला साखर संचालकांची नोटीस पुणे : सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याने नववी शिकलेल्या व्यक्तीस मुख्य शेती अधिकारी बनवल्याचा आरोप असून, यासंदर्भात साखर संचालक (प्रशासन) डॉ. संजयकुमार भोसले यांनी नोटीस पाठवून खुलासा मागवला आहे. नागवडे कारखाना गेल्या काही दिवसांपासून…

साखर घट उतारा प्रमाणिकरणासाठी कारखान्यांना सूचना

Chandrakant Pulkundwar

पुणे : यंदाच्या हंगामात साखर घट उताऱ्याचे प्रमाणिकरण करण्यासाठी सर्व कारखान्यांनी विहित नमुन्यात माहिती भरण्याच्या सूचना साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सर्व कारखान्यांना दिल्या आहेत. आयुक्तांनी कारखान्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे, की ऊस (नियंत्रण) आदेश १९६६ चे कलम ३…

कर्नाटकात एफआरपीपेक्षा दोनशे ते तीनशे रुपये जादा

Sugarcane FRP

कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षा दोनशे ते तीनशे रुपये जादा दर दिला आहे. काही कारखान्यांनी तर साडेतीन हजारांपेक्षा अधिक दर देऊन विक्रम केला आहे. या भागातील कारखाने पहिला हप्ता तीन हजार रुपयांप्रमाणे जमा…

ऊस दराची कोंडी फुटली

‘स्वाभिमानी’ आणि कारखानदार यांच्यात १०० रुपयांवर तडजोड कोल्हापूर : गेल्या हंगामात तुटलेल्या ऊसाला ज्या कारखान्यांनी तीन हजार पेक्षा कमी दर दिला आहे, त्यांनी टनास किमान १०० रुपये व ज्यांनी तीन हजार रुपये दिले आहेत, त्यांनी आणखी किमान ५० रुपये देण्यास…

Select Language »