Category Headlines

imp happenings to be treated as headlines

साखर उद्योगाचा महाग्रंथ ‘इक्षुदंड ते इथेनॉल’

shekhar gaikwad book release

शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन पुणे : ‘इक्षुदंड ते इथेनॉल -साखर उद्योगाची भरारी’ या साखर उद्योग धंद्यावरील महाग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ नेते खासदार श्री. शरद पवार यांच्या हस्ते वसंतदादा साखर संशोधन संस्था (व्हीएसआय, मांजरी) येथे शुक्रवारी झाले. हे पुस्तक माजी साखर…

… तर कारखान्यांसमोर ढोल वाजवू : राजू शेट्टी

Raju Shetti March

गत हंगामातील चारशे रुपयांच्या दुसऱ्या हप्त्यासाठी २ ऑक्टोबरची मुदत कोल्हापूर : मागच्या गळीत हंगामातील उसाचे प्रति टन ४०० रुपये कारखान्यांनी २ ऑक्टोबरपर्यंत द्यावेत; अन्यथा कारखान्यांची साखर अडवू. सर्व साखर कारखानादारांना जागे करण्यासाठी प्रत्येक कारखान्यासमोर ढोल वाजवू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी…

कारखान्यांच्या नफ्यातील वाटा शेतकऱ्यांना द्या, साखर आयुक्तांना ‘आंदोलन अंकुश’चे निवेदन

Andolan Ankush

पुणे : साखर व उप पदार्थांना गेली दोन वर्ष चांगला दर मिळाल्यामुळे साखर कारखाने मोठ्या फायद्यात आले आहेत. त्या नफ्यातील वाटा दुसरा हप्ता म्हणून शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, अशी मागणी ‘आंदोलन अंकुश’ च्या शिष्ट मंडळाने साखर आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांची…

हार्वेस्टर मशीनद्वारे ऊस छाटणीचे फायदे-तोटे व पुढील रूपरेषा

sugarcane harvester

डॉ. योगेंद्र नेरकर(माजी कुलगुरू, म. फुले कृषी विद्यापीठ, राहुरी) ऊस छाटणीतील मजुरांची समस्यामहाराष्ट्रामध्ये ऊस लागवडीखालील क्षेत्र उत्तरोत्तर वाढत आहे. त्यासाठी साखर कारखान्यांनी गाळप क्षमतासुद्धा वाढविली आहे. तथापि गेल्या काही हंगामात मजूर समस्याही वाढल्या आहेत. मजुरांना इतर क्षेत्रात अधिक लाभदायक काम…

शेतकर्‍याजवळ शंभर रूपयेदेखील नसायचे!

Bhaskar Ghule Column

भास्कर घुले,कार्यकारी संचालक, श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना लि. ग्रामीण भागाचे अर्थकारण समृद्ध करणारा साखर कारखाना एकदा माझ्या स्वप्नात आला आणि म्हणाला, ‘तू माझी अनेक वर्षे सेवा केलीस, तर माझ्यासाठी आणखी एक काम कर. माझ्या मनामध्ये अनेक गोष्टी आहेत. मला…

मोटर रिवाइंडिंग कारागीर ते साखर कारखान्याचे संस्थापक

SugarToday Aug 2023 edition

‘शुगरटुडे’ ऑगस्ट २०२३ आवृत्तीमध्ये श्री. पांडुरंगराव राऊत यांची प्रेरणादायी झेप, श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे एमडी भास्कर घुले यांचे नवे सदर ‘मी साखर कारखाना बोलतोय’, देशातील सर्वाधिक उलाढाल करणारे साखर उद्योग यासह भरगच्च वाचनीय मजकूर आहे. तो वाचकांना निश्चित आवडेल.…

छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे 1,272 सभासद अपात्र

Chhatrapati Rajaram sugar

कोल्हापूर : प्रादेशिक साखर सह संचालक (कोल्हापूर) यांनी छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या 1,272 सभासदांना अपात्र ठरवले आहे. त्यामुळे महाडिक गटाला मोठा धक्का बसला आहे. गेल्या एप्रिलमध्ये झालेल्या निवडणुकीत महाडिक गटाने माजी मंत्री सतेज पाटील यांच्या पॅनलचा पराभव केला होता. ही…

अगस्ती कारखाना बंद पडू देणार नाही : अध्यक्ष गायकर यांची ग्वाही

Sitaram Gaikar, Agasti Sugar

अफवा न पसरवण्याचे आवाहन, वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न अहिल्यादेवी नगर : चालू हंगामात बाहेरील (गेटकेनचा) अडीच लाख मेट्रिक टन व कार्यक्षेत्रातील २ लाख मेट्रिक टन अशा एकूण साडेचार लाख मेट्रिक टन उसाचे गाळप अगस्ति सहकारी साखर कारखाना करेल. कारखान्यासाठी सरकार…

सहकारी साखर कारखान्यांना शासन हमीवर कर्ज उपलब्ध करणार

sugar factory

मुंबई : राष्ट्रीय सहकार निगमच्या (एनसीडीसी) निकषात न बसणाऱ्या राज्यातील आजारी साखर कारखान्यांना अर्थसाहाय्य करण्यासाठी शासन हमीवर राज्य सहकारी बँकेकडून मुदत कर्ज उपलब्ध करून देण्याबाबतचे धोरण काही अटी-शर्ती टाकून राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आले आहे. मात्र, त्याचबरोबर साखर कारखान्यास…

तनपुरे कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा ठराव

Tanpure Sugar Factory

अहिल्यादेवीनगर – डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना अखेर भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा ठराव अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या गेल्या आठवड्यात झालेल्या सभेत कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याच्या विषयावर चर्चा…

Select Language »