Category Headlines

imp happenings to be treated as headlines

कार्यकारी संचालक चाळणी परीक्षेत १४ उमेदवार नापास

executive director exam

शिंदे ठरले अव्वल, पात्रतेसाठी ७० गुण पुणे : सहकारी साखर कारखान्यांकरिता कार्यकारी संचालकांची तालिका (पॅनल) करण्यासाठी घेण्यात आलेल्या प्राथमिक (चाळणी) परीक्षेत २३९ उमेदवार उत्तीर्ण झाले असून, १४ जण नापास झाले आहेत. वैकुंठभाई मेहता प्रशिक्षण संस्थेमध्ये ५ एप्रिल रोजी प्राथमिक परीक्षा…

गळीत हंगाम संपल्यात जमा, अवघे सहा कारखाने सुरू

sugarcane cutting

पुणे : यंदाचा ऊस गळीत हंगाम (२०२२-२३) आता संपल्यात जमा आहे. कारण साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या ताज्या पत्रकात अवघे सहा कारखाने सुरू असल्याचे म्हटले आहे. पुढील आठवड्यात संपूर्ण हंगामाची सविस्तर माहिती जाहीर होण्याची अपेक्षा आहे. कमी काळाचा गळीत हंगाम म्हणून…

यंदा पाऊस चांगला

monsoon rain

हवामान खात्याचा अंदाज नवी दिल्ली: यंदाच्या मान्सूनच्या काळात भारतात सामान्य (सरासरीएवढा) पाऊस पडेल, असा अंदाज केंद्रीय हवामान खात्याने मंगळवारी जाहीर केला. भारतीय हवामान खात्याने (IMD) सांगितले की, सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पावसाची 67 टक्के शक्यता आहे. “भारतात नैऋत्य मोसमी पाऊस…

यंदा साखर उत्पादन २४ लाख टनांनी घटणार

sugar production in Maharashtra

पुणे : राज्यात सुरू असलेल्या ऊस गाळप हंगामाच्या सुरुवातीस एकूण साखर उत्पादन अंदाज 130 लाख टन एवढा वर्तविण्यात आला होता. मात्र साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या सुधारित अंदाजानुसार, 106 लाख टन उत्पादन होणार आहे. हा हंगामात जवळजवळ संपला आहे. 205 साखर…

राजाराम साखर निवडणूक: 29 उमेदवारांचे अपील फेटाळले

Rajaram sugar kolhapur

कोल्हापूर : राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अवैध अर्ज ठरलेल्या 29 उमेदवारांचे अपील प्रादेशिक साखर सहसंचालक अशोक गाडे यांनी फेटाळून लावले. हा माजी मंत्री, आमदार सतेज पाटील यांच्या गटाला धक्का मानला जात आहे. त्यामुळे ते या निर्णयालाही आव्हान देण्याच्या तयारीत…

’विस्मा’चा बायोफ्यूएल सेमिनार १९ रोजी

Wisma

पुणे : वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (विस्मा) वतीने येत्या १९ एप्रिल रोजी ‘बायोफ्यूएल अँड बायोएनर्जी’ या विषयावर सेमिनार आयोजि करण्यात आला आहे. पुण्यातील कॉरिथियान्स क्लब येथे सकाळी १० ते सायं. ५ पर्यंत सेमिनारची वेळ आहे. त्यासाठी नोंदणी सुरू झाली…

प्रदूषण स्तर आणखी कमी करणारे तंत्रज्ञान भारतात प्रथमच, उदगिरी शुगरमध्ये

RPC technology in Udgiri Sugar

विटा : उदगिरी शुगर अँड पॉवर लि. या कारखान्यामध्ये आरपीसी प्रणाली बसवण्यात आली असून, यानिमित्ताने भारतात नवे आधुनिक तंत्रज्ञान आले आहे. ते सर्वात आधी भारतात आणण्याचा बहुमान उदगिरी शुगर अँड पॉवर लि. ला मिळाला आहे. त्यामुळे प्रदूषण स्तर आणखी कमी…

‘जयहिंद शुगर’मध्ये ६३ पदांची मोठी भरती

Jobs in Sugar industry

सोलापूर : आचेगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथील जयहिंद शुगर प्रा. लि. या पाच हजार मे. टन गाळप क्षमता असलेल्या साखर कारखान्यामध्ये ६३ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी १६ एप्रिलपर्यंत अर्ज मागवले आहेत. सिनिअर इंजिनिअरपासून सिक्युरिटी ऑफिसर पर्यंतची ही…

‘अगस्ती’च्या उपाध्यक्षपदी सुनीताताई भांगरे

sunita bhangare-agasti sugar

अकोले : अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी दिवंगत अशोकराव भांगरे यांच्या पत्नी सुनीताताई भांगरे यांची निवड करण्यात आली आहे. त्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे यांच्या आकस्मिक निधनामुळे कारखान्याचे…

नियुक्तीच्या दिवशीच निरोप समारंभ

welcome and farewel same day

साखर आयुक्तालयातील सहसंचालकांच्या पदोन्नतीचा असाही गजब किस्सा पुणे : साखर आयुक्तालयामधील एका नियुक्तीचा किस्सा सध्या खूपच गाजत आहे. स्वागत आणि निरोप समारंभ एकाच दिवशी पाहायला मिळण्याच्या दुर्मीळ सरकारी चमत्काराची जोरदार चर्चा आहे. सहसंचालक पदी नियुक्त झालेल्या एका अधिकाऱ्याला त्याच दिवशी,…

Select Language »