दौंड शुगर प्रा. लि. मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

पुणे : जिल्ह्यातील दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्यात विविध विभागांमध्ये भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. कारखान्याची दररोज २५०० टीसीडी ऊस गाळप क्षमता असून ४८ मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प तसेच ३०० केएलपीडी क्षमतेचा डिस्टिलरी प्रकल्प कार्यरत आहे. या पार्श्वभूमीवर अनुभवी व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
इंजिनिअरिंग/को-जनरेशन विभागात असिस्टंट इंजिनिअर (मेकॅनिकल), फिटर, इलेक्ट्रिशियन, डीसीएस ऑपरेटर, वेल्डर, बॉयलर ऑपरेटर, तसेच केन ऑपरेटर अशा विविध पदांसाठी भरती होणार आहे. काही पदांसाठी आयटीआय, डिप्लोमा किंवा संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे.
उत्पादन विभागात VTP केमिस्ट, VTP ऑपरेटर आणि सॅनिटेशन संबंधित पदांसाठीही संधी उपलब्ध असून विज्ञान शाखेतील पदवीधरांना प्राधान्य दिले जाणार आहे.
डिस्टिलरी विभागात केमिस्ट, प्लांट ऑपरेटर, फिटर, फर्मेंटेशन ऑपरेटर तसेच इतर तांत्रिक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. काही पदांसाठी ENA/इथेनॉल प्लांट चालविण्याचा अनुभव आवश्यक आहे.
इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज hr@daundsugar.com ई-मेलवर १८ ऑगस्ट २०२६ पर्यंत पाठवावेत, असे आवाहन व्यवस्थापनाने केले आहे. संबंधित क्षेत्रातील किमान ५ ते १० वर्षांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
ही भरती साखर उद्योगातील अनुभवी तांत्रिक मनुष्यबळासाठी मोठी संधी मानली जात असून पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पत्ता : दौंड शुगर प्रा. लिमिटेड,
रजि. कार्यालय: मु.पो.आलेगाव, ता. दौंड, जि. पुणे



