ऊसतोडीसाठी पैसे मागितल्यास करा कॉल

आवडल्यास ही बातमी शेअर करा

प्रादेशिक साखर सहसंचालक भालेराव यांचे आवाहन

नगर ः ऊसतोडणीसाठी मुकादम, मजूर वा अन्य कोणी पैसे मागितले तर थेट संपर्क करा, त्यासाठी तक्रार निवारण अधिकारी नियुक्त केले आहेत, अशी माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक मिलिंद भालेराव यांनी दिली.

गेल्यावर्षी जादा ऊस होता. त्यामुळे ऊस गाळपासाठी शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या. त्याचा गैरफायदा ऊसतोड कामगार, मुकादम, वाहनचालकांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्याच्या तक्रारी आल्या. यंदा अशी परिस्थिती उद्भवू नये याची आम्ही काळजी घेत आहोत, शिवाय यासाठी प्रत्येक साखर कारखाना पातळीवर एक तक्रार निवारण अधिकारी नियुक्त केला आहे, असे भालेराव यांनी सांगितले.

तक्रार निवारण अधिकारी असे

  • कर्मवीर कुंडलिकराव जगताप कारखाना (कुकडी, श्रीगोंदा) ः एस. बी. कुटाळ- ९५५२५२१०२१,
  • सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखाना (कोपरगाव) ः जी. बी. शिंदे -९३२६२६५८५०,
  • मारुतराव घुले कारखाना (भेंडा) ः सुरेश आहेर – ९६५७७२१४१०,
  • अंबालिका शुगर (राशीन) ः विठ्ठल भोसले -९३०७३२२३१९,
  • प्रसाद शुगर (वांबोरी) ः भरत काळे- ८००७०७८४१३,
  • युटेक शुगर (संगमनेर) ः तांबे – ७७९८९६३४००,
  • कर्मवीर शंकरराव काळे कारखाना (कोळपेवाडी) ः व्ही. व्ही. कापसे – ८२०८४४२१३६,
  • अशोक सहकारी (श्रीरामपूर) ः नारायण चौधरी – ८२०८८६७६५५,
  • संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर (बोधेगाव) ः अभिमन्यू विखे – ९३७०९०११२७,
  • क्रांती शुगर (देवीभोयरे) ः जाधव -७०२८०३८१८१,
  • जयश्रीराम (हळगाव, जामखेड) ः पडवळ – ९९७०००८९२८,
  • पद्मश्री विखे पाटील कारखाना (राहाता) ः एन. जी. चेचरे – ९४२०४९४९८१,
  • गणेश सहकारी ः एस. एस. गमे – ९२८४६८९२८९,
  • सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे (श्रीगोंदा) ः सचिन बागल- ९८५४५०४९९९,
  • मुळा सहकारी (सोनई)- व्ही. एच. फाटके – ९६५७०६०९४२,
  • अगस्ती (अकोले) ः सयाजीराव पोखरकर – ९८८१६८४५५५,
  • वृद्धेश्वर (पाथर्डी) ः के.एस. ढसाळ- ९४२३७५५२०४,
  • सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखाना (संगमनेर) ः भाऊसाहेब खर्डे – ७५८८०७७३३,
  • सोपानराव धसाळ (माळकूप, पारनेर) ः शिवाजी जंजिरे – ८८८८१६०००४,
  • गंगामाई (शेवगाव) ः विठ्ठल शिंदे- ९५५२०००७९९,
  • पियुष (नगर तालुका) ः एस.बी.मस्के – ९६२३०००७९९,
  • साजन शुगर (देवदैठण, श्रीगोंदा) ः नवनाथ दरेकर – ९९२२६१९५०४,
  • साईकृपा हिरडगाव ः विकास क्षीरसागर – ९५६१२१४५४६.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »