बारामती ॲग्रोमध्ये विविध पदांसाठी भरती

पुणे : बारामती ॲग्रो लि.च्या शुगर डिव्हिजन युनिट क्रमांक १, शेटफळगढे, ता. इंदापूर, जि. पुणे येथे विविध विभागांमध्ये हंगामी तसेच कायमस्वरूपी पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. साखर उद्योगातील अनुभवी तसेच पात्र उमेदवारांना या भरतीत संधी मिळणार आहे.
इंजिनिअरिंग विभागातील पदे :
शिफ्ट इंजिनिअर – इन्सिनरेशन बॉयलर, ज्युनिअर इंजिनिअर – इन्स्ट्रुमेंट, DCS ऑपरेटर – इन्सिनरेशन बॉयलर, मिल फिट्टर-B आणि क्रेन ऑपरेटर या पदांचा समावेश आहे.
शुगर प्रोसेस विभागात :
मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट – रिफायनरी, DCS ऑपरेटर – प्रॉडक्शन, पॅन मॅन, MCS/SCS ऑपरेटर, सल्फिटेशन माटे/डिफेकेशन माटे, इव्हॅपोरेशन माटे आणि ट्रेनी ऑफिसर – QA/QC या पदांसाठी भरती होणार आहे.
याशिवाय एन्व्हायर्नमेंट विभागात मॅनेजर – एन्व्हायर्नमेंट, बायो पावडर प्लांटमध्ये सुपरवायझर व फिट्टर, तसेच डिस्टिलरी विभागात शिफ्ट इनचार्ज – CBG, DCS ऑफिसर – CBG, डिस्टिलरी MVR ऑपरेटर, केमिकल इंजिनिअर आणि फार्मा प्लांट ऑपरेटर या पदांसाठीही संधी उपलब्ध आहे.
शैक्षणिक पात्रतेनुसार डिप्लोमा, B.E./B.Sc., BCA/BCS, ITI, HSC तसेच संबंधित अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांना पदनिहाय संधी दिली जाणार आहे. काही पदांसाठी फ्रेशर्स, तर काही पदांसाठी २ ते १० वर्षांपर्यंतचा संबंधित अनुभव आवश्यक आहे.
अर्ज करण्याची अंतिम मुदत २२ ऑगस्ट २०२६ असून इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ई-मेल किंवा व्हॉट्सअॅपद्वारे पाठवावा. अर्जासोबत संबंधित शैक्षणिक व अनुभवाची माहिती देणे आवश्यक आहे.
ई-मेल : satish.kokare@baramatiagro.com
टीप : शिफारस ही अपात्रता समजली जाईल.



