योगेश्वरी शुगरमध्ये विविध पदांसाठी भरती; ३३ जागांसाठी अर्ज मागविले

परभणी : योगेश्वरी शुगर इंडस्ट्रीज प्रा. लि., लक्ष्मीनगर, लिंबा, ता. पाथरी, जि. परभणी या साखर कारखान्यात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन ४५०० मे. टन असून, अभियांत्रिकी व उत्पादन विभागातील एकूण ३३ पदे भरण्यात येणार आहेत.
अभियांत्रिकी विभागात मिल फिट्टर ए ग्रेड, बॉयलर अटेंडंट, बॉयलर फायरमन, बॉयलिंग हाऊस फिट्टर ए ग्रेड, सेंटर फिट्टर ए ग्रेड, इलेक्ट्रिशियन आणि क्रेन ऑपरेटर या पदांचा समावेश आहे. यापैकी क्रेन ऑपरेटरचे पद हंगामी स्वरूपाचे आहे.
उत्पादन विभागात मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट, ज्युनिअर सुपरवायझर, पॅन इन्चार्ज, बॅच टाईप मशिन ऑपरेटर, कंटिन्युअस मशिन ऑपरेटर आणि डॉरमेंट या पदांसाठी भरती होणार आहे. संबंधित पदांनुसार ITI, SSC किंवा B.Sc. (Chemistry) यांसारखी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.
भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा, शैक्षणिक पात्रता, वय, अनुभव, सध्याचा व अपेक्षित पगार यांची माहिती देऊन अर्ज करावा. अर्जदाराकडे संबंधित पदावर प्रतिदिन ४५०० मे. टन गाळप क्षमता असलेल्या साखर कारखान्यात काम केल्याचा ५ ते ७ वर्षांचा अनुभव असणे अपेक्षित आहे. अनुभव नसलेल्या उमेदवारांनी अर्ज करू नये, असे जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे.
इच्छुक उमेदवारांनी २० ऑगस्ट २०२६ पर्यंत अर्ज ई-मेलद्वारे किंवा कारखाना कार्यालयात प्रत्यक्ष सादर करावेत.
ई-मेल : yogeshwari_sugar@rediffmail.com



