एस. पी. शुगरमध्ये विविध पदांसाठी भरती

बीड : घाटसावळी (ता. व जि. बीड) : येथील एस. पी. शुगर अँड ॲग्रो प्रा. लि. या साखर कारखान्यात विविध पदांवर भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. सुमारे ३५०० मे.टन प्रतिदिन गाळप क्षमता असलेल्या या कारखान्यात खालील पदे तातडीने भरण्यात येणार आहेत. संबंधित पदांवर प्रत्यक्ष ४ वर्षे कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
अभियांत्रिकी विभागातील पदे
- मिल फिटर ए ग्रेड – १ पद
- बॉयलिंग हाऊस ए ग्रेड – १ पद
- बॉयलर ए ग्रेड – १ पद
- टर्बाइन ऑपरेटर – १ पद
या पदांसाठी आयटीआय व संबंधित ट्रेडमधील पात्रता आवश्यक आहे. बॉयलर पदासाठी आयटीआयमध्ये प्रथम श्रेणी उत्तीर्ण, तर टर्बाइन ऑपरेटर पदासाठी आयटीआय तसेच दहावी/बारावी उत्तीर्ण पात्रता नमूद करण्यात आली आहे.
उत्पादन विभागातील पदे
- मेन केमिस्ट – १ पद
- ज्यूस सुपरवायझर – १ पद
- पॅन इंजिनिअर – १ पद
मेन केमिस्ट पदासाठी बी.एस्सी. केमिस्ट्री पात्रता, तर ज्यूस सुपरवायझर व पॅन इंजिनिअर पदांसाठी बारावी उत्तीर्ण पात्रता आवश्यक आहे.
इच्छुक उमेदवारांनी शनिवार, दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता कारखाना साइटवर आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अनुभवी उमेदवारांना भरतीमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे.



