शरद कारखान्यात ‘चीफ केमिस्ट’ पदासाठी भरती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कोल्हापूर : शरद सहकारी साखर कारखाना लिमिटेड, (शाहूवाडी परिसर) यांच्या वतीने ‘चीफ केमिस्ट’ या पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

या पदासाठी बी.एस्सी./एम.एस्सी (रसायनशास्त्र) किंवा समकक्ष शैक्षणिक पात्रता आवश्यक असून, साखर कारखान्यातील संबंधित कामाचा किमान अनुभव असणे गरजेचे आहे. उमेदवाराला दररोज ४५०० मेट्रिक टन ऊस गाळप क्षमतेच्या कारखान्यातील प्रक्रियेचा अनुभव असावा, तसेच संबंधित क्षेत्रात किमान ५ वर्षांचा अनुभव अपेक्षित आहे.

अर्ज करताना उमेदवारांनी संपूर्ण नाव, पत्ता, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता, अनुभवाची माहिती तसेच आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा. अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ८ दिवसांच्या आत आहे.

अर्ज ई-मेलद्वारे sharad_sakhar@rediffmail.com या पत्त्यावर पाठवावेत. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी कारखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »