पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील कारखान्यात विविध पदांसाठी भरती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कोल्हापूर : जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखाना लिमिटेडने विविध तांत्रिक व सहाय्यक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. कारखान्याचा विस्तार आणि आधुनिकीकरण लक्षात घेता अनुभवी तसेच पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

उपलब्ध पदांमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअर, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअर, ज्युनिअर सुपरवायझर आणि बॉयलर ऑपरेटर यांचा समावेश आहे. संबंधित पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली असून काही पदांसाठी अनुभव आवश्यक आहे. विशेषतः इंजिनिअर पदांसाठी बी.ई. (Electrical/Instrumentation/Electronics) तर इतर पदांसाठी 12वी उत्तीर्ण व फॅक्टरी अ‍ॅक्टनुसार आवश्यक पात्रता अपेक्षित आहे.

इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह कारखान्याच्या dypatilsskltd@gmail.com या अधिकृत ई-मेलवर पाठवावेत. ही भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडणार असून पात्र उमेदवारांना संधी मिळणार आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक आणि चेअरमन यांनी इच्छुक उमेदवारांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

टीप – १. मागासवर्गीय उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. २. वरील पदांकरीता किमान ५ ते ७ वर्षांचा अनुभव आवश्यक.

पत्ता : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखाना लि., ज्ञानशांतीनगर, वेसरफ-पळसंबे, पो. असळज, ता. गगनबावडा, जि. कोल्हापूर.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »