Tag aher poem

ह्याले ढोंग म्हणते!

W R Aher Poem

रडू नको दादा, मी दिल्लीमधी जाते|रेवड्या मी आणते, मग तुला भरविते|| रडू नको दादा, मी मुंबईला जाते|मलीदा मीआणते,मग तुला भरविते|| रडू नको दादा, मी नाशिकला जाते|शेततळे आणते,मग तुला भरविते|| रडू नको दादा, मी मंत्र्याला भेटते|फुकट धान्य आणते, मग तुला भरविते||…

मनाला निराश करू नका

काम करा जरा काम करा |जगी आला तर काम करा||इथे जन्माचे सार्थक करा|समाजोपयोगी काम करा||व्यर्थ न जाय मानव जन्म|मनाला निराश करू नका||१|| मुहूर्ताची वेळ वाया जायी|उपकार हा वाया न जायी|| जग स्वप्नमय मानूं नका|मार्ग आपला करा प्रशस्त||ईश्वर आहे पाठीशी उभा |मनाला…

मेहनतीचे फळ

Hard Working Woman

जोश टिकण्यासाठी ठेवा ध्यानी हेही|मेहनती शिवाय यश कोठेही नाही|| ध्येयाची वाटचाल करा काळोखातही|बघा काजवे चमकती अंधारातही||१|| मेहनतीने दीपक प्रज्वलित करा|विजयश्रीची पताका फडकत ठेवा||जीवनात सुखदुःख पाळीने येतील|त्याचसोबत आपणही पुढेच जावा||२|| अनुभव  मेहनतीचे सोनं करील|ध्येयासाठी मेहनत करावी लागेल||मेहनती शिवाय काही मिळत नाही|उन्हात उभे…

वारसा डळमळला …

कलीयुगी काळवेळ  बदलला|मानवाच्या बुद्धीला पडली छिद्र||त्याने मानवी  विचार बदलला|पण नाही बदलले  सुर्य चंद्र||१|| खिसा रिकामा पण  ऐट जोमानं|पाहुण्यांनी  भरेघरआनंदानं||काका,मामा, दादा,नाना यांना मान| मावशीसह,सगळ्यांचा  सन्मान||२|| होती पोरं लाडाची एक समान|भाऊ भाऊ दिसती रामलक्ष्मण||सगळेआजोबांचे वारसदार|घरीदारी होते एकच चुल्हाण||३|| चटणी भाकरी न कांदा लसूण|खायचे, तयांना हेच  पकवान|| येत नसे थकवा…

तू आल्यावर घराला घरपण आले

Aher Poem

पहिल्यांदा घराला सोळा खांब लावले|आता खांब गेले, घर एकखांबी झाले|तू आल्यावर घराला घरपण आले||१|| आधी भाऊबीजेला भेटायची बहीण|आता पोस्टाने करदोटा धाडी बहीण|तू आल्यावर घराला घरपण आले||२|| पहिले भाऊ घरी  चौकशी करायचे|आता कधी फोनवर हाय म्हणायचे|तू आल्यावर घराला घरपण आले||३|| आधी आईला…

रडू नको मुला !

W R Aher Poem

चिमणी येईल |चिवचिव करील||दाणा पाणी घेईल |खेळविल तुला ||१|| वारा येईल |गाणे गाईल||नाचून घेईल |खेळविल तुला ||२|| झाड बोले|सावली देईल ||ताप हरील|खेळविल तुला ||३|| फुल बोलले |गंध देईल तुला ||रंग देईल तुला |खेळविल तुला ||४|| मग बोले सृष्टी |काढी त्याची…

माझ्या दिलवरा

Aher Poem

आडरस्त्यावर नको सोडून जाऊ मला,एखाद्या वळणावर नको सोडून जाऊ मला.खिंड लढवू या पण नको सोडून जाऊ मला,हट्ट करून नको सोडू माझ्या दिलवरा. ॥१॥ मनात जे येतं तसं नको घडायला,तुझा जिव्हाळा विरंगुळा वाटे मला.नको दूर जाऊ, भीती वाटते मला,शोधीन तुला दारोदार…

मी भरारी घेईन !

Aher Poem Bharari

मी शांततेने बसलो, शब्दांच्या बाजारात|इतरांशी प्रत्येकजण होता बोलत||ना बोललो काहीच,ना ऐकलं काहीच|मी लढत होतो स्वतःच्या विचाराशीच||१|| विचार लिहिलेली ओळं पुसली गेली|भेंडी बाजारात शांतता प्रिय वाटली||तेव्हा कळलं,अन मी मौन बाळगले|ना रडलो,हसलो,बस्सं विलोम केले||२|| सर्वांना ठीकठाक दिसलो बाहेरून|तरी  मी आतून पडलो कोलमडून||तेव्हा खुप…

|| देशभक्तीच्या झळा ||

aher poem

अरे मित्रा तू सर्वांनाच मदत करतो|तु  तसा सर्वांना सोबत घेऊन चालतो||पण अखेरच्या काळामध्ये मित्रचं काय|सावलीसुध्दा तुला सोडेल खरंकी काय ||१|| दुसऱ्याच्या आनंदात तु आनंद ‌मानला|दुसऱ्याचे अश्रू पुसले, तु अश्रूमय झाला||दुसऱ्यांचे दुःख तु आपलं दुःख मानलं|तु आपले दुःख आपल्या  मनात ठेवलं ||२|| सर्वाच्या  वाटेवर…

विरह भावगीत

सांगा हो सजना, काय करता?माझ्यापासून दूरच राहून ।।इथं मी एकटी कशी राहाते?तुझ्या विरहाचे अश्रू ढाळून ।।१।। काय सांगू दिलाच्या दिलवरा,तुझ्यापासून मी दूर राहून ।।तुझ्या भेटीचीच वाट पाहते,माझ्या देवाला साकडे घालून ।।२।। काय जाहले आज तुजला गं?सखी विचारी खोदून खोदून ।।काय…

Select Language »