Tag aher poem

“वाळूचे कण” : जीवनानुभवांची समृद्ध मांडणी

W R Aher Poetry Book

    ज्येष्ठ साहित्यिक वाळू रघुनाथ आहेर यांचा सातपूर (नाशिक) येथील ज्ञानसिंधू प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून अतिशय देखणा ‘वाळूचे कण’ हा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे. यापूर्वी ‘अंतरीचे बोल’ हा त्यांचा पहिला आशयसंपन्न काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. शेतकरी बांधवांसह ऊसतोड मजुरांच्या जिव्हाळ्याचा विषय…

येरे घना |ये रे घना||

लवकर ये,दौडत ये घनाकृपाळासहन होईना तापदायक उन्हाळाग्रीष्माने तरूवर वेली निष्पर्ण झालेपशूपक्षी मानवप्राणी हैराण झाले||१|| एसी कुलर पंखे काम करेना झालेसावलीच्या सगळेच शोधात निघालेडोंगर बोडके ,जंगले,झाडं तोडलेनद्यानाले ,तळी, धरणे कोरडी झाले||२|| सगळीकडील  पाणीसाठे कमी झालेसरकारी पाण्याची कपात लागू झालीटॅंकरच्या लाॅबीवाले कामाला लागलेजंगलात…

एल निनो …

El Nino Poem by W R aher

आला आला एलनिनो दारासोबत नाही मान्सून  वारापाऊस पाणी गेला माघारामिरवत आला खोटा तोरा ||१|| राजाने दिली याची खबरराजाने सभेत  उपाय केलाकमी खत पाण्याची पिकं घ्यासेंद्रिय शेतीला प्राधान्य द्या||२|| पाणीप्रश्न सहज सोडवूआला दुष्काळ , खावटी देवूतृष्णा लागली , विहीर खोदूचारा वाटू , टॅंकर…

असे कसे हे ट्रम्प राव!

  करुया आरती माझ्या तात्या ट्रंपरावा   अहो राया , अहो राया,  तुम्ही ट्रंप राया |   अगाध हो तुमची मुजोर अपकिर्ती असे कसे झाले तुम्ही अविचारी राया||१||   ‌‌रोजच वाटते तुमची जगाला धास्ती कोणीच नाही हो राजी करायला दोस्तीअरब जगताची तुमच्याकडे चावीपाटलाच्या डोक्यावर…

चला जरा वृंदावनाला जाऊ!

Aher poem Apr 26

हरी बासरीने गीत गाईल |राधा राणी झोक्यावर खेळेल||मोहन प्रेमाने झोका देईल|राधाकृष्णाचा जागर होईल||चला जरा वृंदावनाला जाऊ||१|| शेकडो गवळी दादांना भेटू|तयांची ती माखन चोरी पाहू||बाके बिहारीचे दर्शन घेऊ|खुप सुंदर सजावट पाहू||चला जरा वृंदावनाला जाऊ||२|| तेथे  संतांचा कायम निवास|हरीनामाचा तयांनाही ध्यास||यमुनेच्या घाटावरती जाऊ|स्नान…

मुखी असे रामनाम !

Aher Poem Ramnam

गाठीला नाही  दमडीनाही खरचाया दाम||नाही वेचली कवडीमुखी असे रामनाम ||१|| होते बंधू शक्तीमानभरत लक्ष्मणासम||ज्यांचा तिन्ही लोकी डंकामुखीअसे रामनाम ||२|| प्रभुचरण स्पर्शानेपावन शबरीधाम||पावन किरात गुहामुखी असे रामनाम ||३|| नाही मी सती अहिल्याजरी ना मी वाल्यासम||अप्रिय माझ्या सावल्यामुखी असे राम नाम ||४|| रामभक्त…

नका ढोसू दारू !

नका येऊ धनी रोज दारू पिऊन| लहान लेकरं पळती घाबरून||  मग कशी मिळेल बापाची माया|रोज नका डाफरु त्यांच्यावर राया||१|| रोज रोज भांडण  दारूपायी होई|अहो तुम्ही करा ना धंदापाणी काई ||मति खुंटली चालेना काही उपाय|शेवटी टाकला घराबाहेर पाय||२|| चार घरचा झाडून …

पाळणा

Aher Poem Jan 26

झोप रे माझ्या  सोनुल्या|        नका रे वाजवू चाळ ||  झोपले जग हे सारे |     झोपेल इवले बाळ||१||      वारा गाईल अंगाई|        . म्हणे कर गाई गाई||        झोका देते तुज आई|        येऊ लागली जांभई||२|| खेळणी सारी झोपली|    स्वप्नी पाळणा हलला| चांदोमामा…

मैत्री

Aher Poem

उद्या असेन मी नसेन मी |पण मित्रांसवे असेन मी ||चांगले करीन मित्रांचे मी |वाईटाचा धनी होईन मी||१|| नका माझे उपकार ठेऊ|पण दोष नका मला देऊ||निरोप द्यायला नका येऊ |पण विसरू नको रे भाऊ||२|| आपली जुळली आहे नाळ|भल्या बु-याला बघेल काळ||जराही…

अरे माणसा माणसा

aher poem

अरे माणसा माणसा |जै डोंबारी तारेवर||तै समतोल नजर|मग मिळेल भाकर||१|| अरे माणसा माणसा|खोटं कधी बोलू नये||सुगरणीच्या घरट्याला|खोपा, कधी म्हणू नये||२|| अरे माणसा माणसा|निसर्गाची कला न्यारी||जरि शेंग ती काटेरी| सागरगोटे अंतरी||३|| अरे माणसा माणसा|माझ्या जीवाचा मैतरं||आहे मोठा जादूगार|त्यांवर माझी मदार||४|| अरे माणसा…

Select Language »