SugarToday

SugarToday

एकसष्ठी निमित्त विशेष लेख…

Ravikant Patil, 61st Birthday Year

माझे परमस्नेही श्री. रविकांत पाटील यांची सन २०२५ मध्ये वयाची एकसष्ठी सुरू आहे. त्यानिमित्त त्यांच्या साखर उद्योगातील योगदानाबद्दल लेख लिहिण्याच्या विचाराने मूळ धरले व तशा प्रकारचे विचार सुरू झाले. त्यादृष्टीने मला त्यांचे विषयी असलेल्या माहिती व्यतिरिक्त माहिती जमा करण्याचे काम मी सुरू केले. त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या सहकाऱ्यांशी संपर्क…

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर फेकला ऊस

CM Agitation

कोल्हापूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एका कार्यक्रमानिमित्त कोल्हापुरात आले असता, त्यांच्या ताफ्यावर शेतकरी संघटनेच्या आंदोलकांनी ऊस फेकण्याचा प्रयत्न केला. यावेळी गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी मुख्यमंत्री उजळाईवाडी विमानतळाकडे जात असताना त्यांच्या वाहनांच्या  ताफ्यावर शेतकऱ्यांनी उसाच्या कांड्या टाकून मुख्यमंत्र्यांचा निषेध केला. त्यावेळी ऊस दरावरून शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते. तसेच एक कार्यक्रम संपवून मुख्यमंत्री बाहेर पडत असताना  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका कार्यकर्त्याने  ऊस दराचा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्र्यांना अडवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे कार्यक्रमात एकच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. ऐनवेळी कार्यकर्त्याने गोंधळ घातल्याने सुरक्षा रक्षकांसह सर्वांची पळापळ झाली. यावेळी त्या कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

साखर मूल्यांकन दर ३८०० रु. करा : साखर संघाची मागणी

पुणे/मुंबई : सहकारी साखर कारखान्यांची संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ मर्यादित (Mahasugarfed) ने खुल्या बाजारातील साखरेच्या मूल्यांकन दरात (Valuation Rate) वाढ करण्याची मागणी केली आहे. संघाने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. (MSC Bank) कडे पत्र लिहून किमान रू. ३८०० प्रति क्विंटल मूल्यांकन…

‘महा-सहकार’ त्रैमासिकाचे प्रकाशन

MCDC Tri Monthly Magazine Pune

मुंबई : महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकारे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘महा-सहकार’ या त्रैमासिकाचे प्रकाशन  महामंडळाचे अध्यक्ष, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते मुंबईत झाले. त्रैमासिकाचा हा पहिलाच अंक असून, तो आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाला समर्पित आहे. या निमित्ताने सहकार चळवळीच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. मंत्रालयात मंगळवारी…

तू आल्यावर घराला घरपण आले

Aher Poem

पहिल्यांदा घराला सोळा खांब लावले|आता खांब गेले, घर एकखांबी झाले|तू आल्यावर घराला घरपण आले||१|| आधी भाऊबीजेला भेटायची बहीण|आता पोस्टाने करदोटा धाडी बहीण|तू आल्यावर घराला घरपण आले||२|| पहिले भाऊ घरी  चौकशी करायचे|आता कधी फोनवर हाय म्हणायचे|तू आल्यावर घराला घरपण आले||३|| आधी आईला…

शून्य टक्के *मिल बंद तास* संकल्पना राबवा : आहेर

WR Aher Newasa,

नेवासा : तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना अधिकारी व कामगारांकरिता कौशल्य विकास प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. यावेळी साखर उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ वाळू आहेर यांनी मार्गदर्शन केले. कारखान्याची उत्पादक क्षमता वाढवण्यासाठी शून्य टक्के ‘मिल बंद तास’ ही संकल्पना राबवणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त साखर उद्योगातील अधिकारी आणि कामगारांसाठी सोमवार दि.२७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या प्रशिक्षण शिबिरात साखर उद्योगातील ख्यातमान तंत्रज्ञ वाळू आहेर यांनी शुन्य टक्के मिल बंद तास व साखर उद्योगातील हाय प्रेशर बॉयलर ऑपरेशन,मेन्टेनन्स आणि सेफ्टी याविषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आ.पांडुरंग अभंग,संचालक काकासाहेब नरवडे, काकासाहेब शिंदे, शिवाजीराव कोलते, अशोकराव मिसाळ,दादासाहेब गंडाळ,कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सरव्यवस्थापक रविंद्र मोटे, तांत्रिक सल्लागार एस.डी. चौधरी, एम.एस.मुरकुटे, मुख्य अभियंता राहुल पाटील,…

लिस्बन भूकंप आणि त्सुनामी

आज शनिवार, नोव्हेंबर १, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर कार्तिक १०, शके १९४७सूर्योदय : ०६:३९ सूर्यास्त : १८:०५चंद्रोदय : १५:०० चंद्रास्त : ०३:०८, नोव्हेंबर ०२शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूदक्षिणायनऋतु : शरद्चंद्र माह :…

सरदार वल्लभभाई पटेल

Sardar Patel

आज शुक्रवार, ऑक्टोबर ३१, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर कार्तिक ९, शके १९४७सूर्योदय :०६:३८ सूर्यास्त : १८:०५चंद्रोदय : १४:२३ चंद्रास्त : २६:११+शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूदक्षिणायनऋतु : शरद्चंद्र माह : कार्तिकपक्ष : शुक्ल…

Select Language »