सहकार क्षेत्राला बळ; राज्य सहकारी बँकेला ५ हजार कोटींचे खेळते भांडवल

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : महाराष्ट्रातील सहकारी संस्थांना कर्जपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने (एनसीडीसी) राज्य सहकारी बँकेला तब्बल ५ हजार कोटी रुपयांचे खेळते भांडवल कर्ज मंजूर केले आहे. एनसीडीसीच्या टर्म असिस्टन्स योजनेअंतर्गत हे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या निधीचा उपयोग राज्य सहकारी बँकेमार्फत तिच्या सभासद सहकारी संस्थांना पुढील कर्जपुरवठ्यासाठी केला जाणार आहे. त्यामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यास तसेच त्यांच्या आर्थिक व्यवहारांना गती मिळण्यास मदत होणार आहे.

एनसीडीसीने १० ऑगस्ट २०२६ रोजी जारी केलेल्या मंजुरीनुसार, पाच वर्षांच्या कालावधीसाठी हे ५ हजार कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. कर्जाची परतफेड दहा सहामाही हप्त्यांमध्ये करण्याची तरतूद आहे. तसेच कर्जाची उचल एक किंवा त्यापेक्षा अधिक हप्त्यांमध्ये करता येणार आहे.

विशेष म्हणजे, एनसीडीसीच्या मंजुरीनंतर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला अशा प्रकारचे मोठे खेळते भांडवल कर्ज उपलब्ध झाले असून, राज्यातील सहकारी क्षेत्रासाठी हा महत्त्वाचा आर्थिक निर्णय मानला जात आहे.

सहकारी संस्थांना मोठा फायदा

या निधीच्या माध्यमातून राज्य सहकारी बँक आपल्या सभासद सहकारी संस्थांना पुढील कर्जपुरवठा करू शकणार आहे. त्यामुळे सहकारी संस्थांच्या खेळत्या भांडवलाची गरज भागविण्यासह त्यांच्या आर्थिक व्यवहारांना अधिक गती मिळण्याची अपेक्षा आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »