Category राजकीय

मुलासाठी आईचा राजीनामा, नीरज मुरकुटे तज्ज्ञ संचालक

Niraj Murkute , Manjushri Murkute

अहिल्यादेवीनगर : अशोक सह. साखर कारखान्याचे सर्वेसर्वा माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची तिसरी पिढी साखर उद्योग क्षेत्रात आली आहे. सिद्धार्थ मुरकुटे यांचे चिरंजीव नीरज यांची नुकतीच अशोक कारखान्याच्या तज्ज्ञ संचालक पदी निवड करण्यात आली आहे. नीरजने राजकारणात सक्रिय व्हावे, यासाठी…

सिद्धी शुगरचे चेअरमन बाबासाहेब पाटील नवे सहकारमंत्री

Babasaheb Patil, Cooperation Minister

मुंबई : साखर उद्योगाचे नियंत्रण असणाऱ्या सहकार खात्याचे नवे मंत्री म्हणून आमदार बाबासाहेब पाटील यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) अहमदपूरचे (जि. लातूर) आमदार असून, ६६ वर्षांचे आहेत. त्यांचा नुकताच म्हणजे ५ डिसेंबर रोजी वाढदिवस…

अजित पवारांची 1000 कोटींची मालमत्ता ‘आयकर’कडून मुक्त

Jarandeshwar sugar

मुंबई : जरंडेश्वर साखर कारखान्याच्या फंडाशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संबंध जोडण्याएवढे पुरावे नाहीत, असे स्पष्ट करत यासंबंधींचे दावे इन्कम टॅक्स अपिलेट ट्रिब्युनलने फेटाळून लावले. त्यामुळे प्राप्तिकर (आयकर) विभागाने 2021 मध्ये अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून जप्त केलेल्या ₹ 1,000…

कोणत्या साखरसम्राटांना लागला आमदारकीचा गुलाल?

sugar industry winners

भागा वरखडे ……………साखर कारखाना ताब्यात असला, की त्यातून राजकारण करता येते. विधानसभेचं दार खुलं होतं; परंतु सर्वंच साखर सम्राटांना हे दार खुलं होत नाही. काहींना कारखान्याचा कारभार घरी बसवतो, तर काहींनी कितीही काम केलं, तरीही त्यांना मतदार विधानसभेत पोचू देत…

या राज्यात ऊस दर ४ हजारांवर

Sugarcane co-86032

चंडीगड : पंजाब सरकारने राज्य ऊस शिफारस दरामध्ये (एसएपी) दहा रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे राज्यातील एसएपी प्रति क्विंटल ४०१ वर गेली आहे. म्हणजेच टनाला रू. ४०१० दर. याचबरोबर पंजाब हे देशातील सर्वाधिक ऊस दर देणारे राज्य ठरले…

ग्रामीण भागात नव्या दोन लाख सहकारी संस्था निर्माण करणार : मोदी

Modi at ICA conference

नवी दिल्ली : सहकाराचे तत्त्व भारताचा आत्मा असून, आगामी काळात देशाच्या ग्रामीण भागामध्ये नव्या दोन लाख बहुउद्देशीय सहकारी संस्था स्थापन करण्याचे आमच्या सरकारचे उद्दिष्ट आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. तसेच सहकारी चळवळीला चक्रीय अर्थव्यवस्थेशी जोडण्याची गरज असल्याचेही…

बड्या साखर कारखानदारांना पराभवाचा धक्का

Maharashtra Assembly Elections

मुंबई : साखर उद्योग क्षेत्रातील अनेक नामवंतांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मातब्बर नेत्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. माजी सहकारमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे नेते बाळासाहेब पाटील, राजेश टोपे, मांजरा साखर परिवाराचे धीरज देशमुख, राधानगरीचे के. पी.…

साखर उद्योगातील तरुण नेतृत्व : ‘शुगरटुडे’ विशेषांक प्रसिद्ध

SugarToday Diwali 2024 Edition

पुणे : साखर आणि सहकार विश्वाला समर्पित एकमेव मराठी मॅगेझीन ‘शुगरटुडे’चा दीपावली विशेषांक प्रसिद्ध झाला आहे. साखर कारखानदारीमध्ये तरुण नेते देत असलेल्या योगदानावर या अंकात विशेष अंकात प्रकाश टाकण्यात आहे. ‘शुगरटुडे’ मॅगेझीन गेल्या दोन वर्षांपासून नियमितपणे प्रकाशित होत आहे. सध्या…

शरद पवारांनी साखर कारखाना होऊ दिला नाही : अजितराव घोरपडे

AJITRAO GHORPADE

सांगली : कवठेमहांकाळचा कारखाना आर. आर. पाटलांच्या सांगण्यावरून शरद पवारांनी मल्टीस्टेट केला व बंद पाडला. त्यानंतर आम्ही कवठेमहांकाळ येथे काढत असलेला साखर कारखानाही आर. आर. पाटलांच्या कार्यकर्त्यांनीच कामाच्या निविदा भरल्या, शरद पवारांनी अधिकाऱ्यांना दम देऊन कारखाना होवू दिला नाही. त्यामुळे…

नव्या दमाच्या साखर कारखानदारांसह ७९ जण आमदारकीच्या आखाड्यात

Maharashtra Assembly Elections

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत यावेळी नव्या दमाचे अनेक साखर कारखानदार निवडणूक रिंगणात आहेत. त्यात सत्यशीलदादा शेरकर, अभिजितआबा पाटील, राहुल आवाडे आदींचा समावेश आहे. तसेच समरजिसिंह घाटगे यांच्यासह अनेक तरुण साखर कारखानदारही आमदारकीच्या आखाड्यात उतरले आहेत. काहींची दुसरी,…

Select Language »