नऊ कारखान्यांना ११०० कोटींची थकहमी : राज्य सरकारचा निर्णय

पुणे ः विधानसभा निवडणुकीत सहकार्य केलेल्या सत्ताधाऱ्यांच्या नऊ कारखान्यांना ११०० कोटी रुपयांच्या कर्जाला थकहमी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. राष्ट्रीय सहकार निगम (एनसीडीसी) मार्फत कमी व्याज दराने हे कर्ज दिले जाणार असून, त्याला राज्य शासनाची हमी या निर्णयाने मिळाली आहे.…