Category Headlines

imp happenings to be treated as headlines

धाराशिव कारखान्याच्या अधिकाऱ्यास कोटीचा गंडा

धाराशिव : भामट्याने साखर कारखान्याचा चेअरमन असल्याचे भासवून एका अधिकाऱ्यास तब्बल एक कोटीचा गंडा घातल्याचा प्रकार धाराशिवमध्ये १५ एप्रिल ते १७ एप्रिलच्यादरम्यान घडला आहे. यासंदर्भात धाराशिव साखर कारखान्याचे अधिकारी बाबासाहेब वाडेकर यांनी सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात भामट्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल…

साखरेसह ट्रकची चोरी; चालक पोलिसांच्या ताब्यात

श्रीरामपूर : भोकरदनमध्ये ट्रान्सपोर्टचालकानेच १२ लाख ४४ हजार ५६५ रुपये किमतीची साखर परस्पर विक्री केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता श्रीरामपूरमध्येही चालकाकडून साखरेसह चक्क ट्रकचीही चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. उल्हासनगर येथे २४ टन साखर पोहोचविण्याची ऑर्डर असताना चालकाने ट्रकची…

कर्नाटक, तमिळनाडूत विशेष हंगामाची शक्यता

पुणे : दक्षिण कर्नाटकात व तमिळनाडूत उसाच्या वाढत्या लागवडीमुळे पुरेशा प्रमाणात ऊस उपलब्ध आहे, त्यामुळे या दोन्ही राज्यांतील काही कारखाने आपला विशेष हंगाम जुलै ते सप्टेंबर या कालावधीत सुरू करण्याची शक्यता इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (इस्मा) व्यक्त केली…

१२ लाखांची साखर परस्पर विकली; गुन्हा दाखल

भोकरदन : तब्बल १२ लाख ४४ हजार ५६५ रुपये किमतीची साखर ठरवून दिलेल्या ठिकाणी पोहच न करता परस्पर विक्री केल्याप्रकरणी एका ट्रान्सपोर्टचालकावर भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात हातकणंगले येथील एका व्यापाऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.…

राज्यातील गाळप हंगाम समाप्त; साखर उत्पादनात घट

Sugar Prices

पुणे : राज्यातील अंतिम टप्प्यात असलेला गाळप हंगाम अखेर संपला आहे. यंदा राज्यात ८० लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत ते तब्बल ३० लाख टनांनी घटल्याचे स्पष्ट होते. अवकाळी पावसाचा अभाव, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव या कारणांमुळे…

स्मार्ट शेतीसाठी स्वयंचलित हवामान केंद्र कसे बसवाल?

Smart Agriculture Weather Station

आजच्या जलद बदलणाऱ्या शेतीच्या पार्श्वभूमीवर, अचूक शेती व डेटा-आधारित निर्णय प्रक्रियेमुळे शेतीचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. याच्या केंद्रस्थानी असलेले स्वयंचलित हवामान केंद्र (AWS) हे एक छोटं, बुद्धिमान उपकरण आहे जे शेतकऱ्यांना स्थानिक हवामानाची रिअल टाइम माहिती देऊन शेती अधिक शाश्वत…

पुणे प्रादेशिक साखर सहसंचालकपदी देशमुख

Avinash Deshmukh. Jt Director Sugar

पुणे : पुणे प्रादेशिक साखर सहसंचालकपदी अविनाश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  निलिमा गायकवाड यांची पणन संचालनालयातील पणन सह संचालक पदावर अचानक बदली करण्यात आल्याने त्यांचा साखर सहसंचालकपदाचा अतिरिक्त पदभार साखर आयुक्तालयातील सह संचालक (उपपदार्थ) देशमुख यांच्याकडे देण्यात आला…

‘श्री विघ्नहर’ वगळता राज्याचा गळीत हंगाम आटोपला

Shrinath Mhaskoba sugar Crushing

पुणे : जिल्ह्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना वगळता, महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांचा २०२४-२५ चा ऊस गळीत हंगाम संपला आहे. साखर आयुक्तालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्यात यावेळी ८० लाख ७६ हजार मे. टन साखर उत्पादित झाली आहे. राज्यात २०० साखर कारखान्यांनी…

श्री विघ्नहर कारखाना १५ मे पर्यंत चालणार

Sugarcane Crushing

पुणे : चेअरमन सत्यशीलदादा शेरकर यांच्या नेतृत्वाखालील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना येत्या १५ मे पर्यंत चालणार आहे. त्यामुळे तो यंदा सर्वात मोठा हंगाम घेणारा साखर कारखाना ठरेल. श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्कर घुले यांनी सांगितले की,…

‘आदिनाथ’च्या २१ जागांसाठी उद्या मतदान

adinath sugar

करमाळा : येथील आर्थिक जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी उद्या, गुरुवार, दि. १७ एप्रिल रोजी मतदान होत आहे. एकूण २१ जागांसाठी हे मतदान होत आहे. त्यामुळे अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत आजी-माजी आमदारांची…

Select Language »