साखर विक्रीचा तपशील पुन्हा सादर करा!

सरकारने विक्रीचा तपशील पुन्हा मागवला
नवी दिल्ली : अन्न मंत्रालयाने सर्व साखर कारखान्यांना २०२५–२६ या आर्थिक वर्षात शीतपेय उत्पादकांसारख्या मोठ्या ग्राहकांना केलेल्या ५०० टन किंवा त्याहून अधिक साखरविक्रीचा तपशील सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. आतापर्यंत सादर करण्यात आलेली माहिती अपूर्ण किंवा चुकीची असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
अनेक कारखान्यांनी आवश्यक माहिती दिलेली नाही, तर काहींनी दिलेला तपशील अपूर्ण आणि/किंवा चुकीचा असल्याचे मंत्रालयाने कारखान्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.
देशांतर्गत बाजारातील साखरेचा पुरवठा आणि वितरणावर लक्ष ठेवण्यासाठी तसेच मोठ्या ग्राहकांना होणाऱ्या विक्रीत पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी ही माहिती पुन्हा मागवण्यात आली आहे. यामध्ये कारखान्यांकडून थेट खरेदी करणाऱ्या तसेच एजंट आणि डीलर्समार्फत अप्रत्यक्षपणे खरेदी करणाऱ्या ग्राहकांचाही समावेश असावा, असे सांगण्यात आले आहे.
३० ऑक्टोबरपर्यंत मुदत
कारखान्यांनी विक्रीच्या पावत्या आणि रवानगीच्या तपशीलासह पूर्ण व अचूक माहिती सादर करावी. ही माहिती त्यांच्या नोंदींशी पडताळून पाहिलेली असावी आणि ३० ऑक्टोबरपर्यंत न चुकता पाठवावी, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
देशांतर्गत पुरवठा कमी असताना आणि किरकोळ भाव स्थिर असताना मंत्रालय साखरेच्या विक्रीवर लक्ष ठेवून आहे.






