Tag sugar industry news

बागेश्वरी साखर कारखान्यात स्फोट; दोन कर्मचारी ठार

Ma Bageshwari Sugar Explosion

जालना : परतूर जवळील वरफळ शिवारातील माँ बागेश्वरी साखर कारखान्यात गुरुवारी सायंकाळी झालेल्या गंधक (सल्फर) भट्टीच्या स्फोटात दोन कर्मचारी जागीच ठार झाले, तर दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. आबासाहेब शंकर पारखे (वय ४४, रा. शिरसगाव ता. परतूर), पर्यवेक्षक अशोक तेजराव…

कुंभी-कासारी कारखान्याचा ऊस दर राज्यात सर्वाधिक

KUMBHI KASARI SSK

कोल्हापूर : कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याकडून यंदाच्या गळीत हंगामाकरिता उसाला प्रतिटन ३ हजार ३०० रुपयांप्रमाणे पहिला हप्ता दिला जाईल, अशी घोषणा कारखान्याचे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांनी केली आहे. हा राज्यातील आतापर्यंत सर्वाधिक दर आहे. आ. नरके म्हणाले, हंगाम २०२४-२५…

‘शुगरटुडे’च्या विशेषांकाचे पुणे पुस्तक महोत्सवात प्रकाशन

पुणे : महाराष्ट्रातील साखर उद्योग आणि सहकार क्षेत्राला समर्पित एकमेव मराठी मासिक ‘शुगरटुडे’ने दीपावलीनिमित्त प्रसिद्ध केलेल्या विशेषांकाचे पुण्यातील ऐतिहासिक पुस्तक महोत्सवात मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी पुणे बूक फस्टिव्हलचे आयोजक राजेश पांडे, नॅशनल बूक ट्रस्टचे संचालक कर्नल युवराज मलिक,…

सेन्ट्रल रेल्वे ग्राहक सल्लागार समितीवर बी. बी. ठोंबरे

B B Thombare

पुणे- वेस्ट इंडियन शुगर मिल्स् असोसिएशन, पुणे या संघटनेचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांची सेन्ट्रल रेल्वे ग्राहक सल्लागार समिती सदस्य म्हणून निवड झाली आहे. ठोंबरे हे महाराष्ट्रातील मध्य रेल्वेच्या कार्यकक्षेतील सर्व प्रकारच्या सेवा उपभोक्ता सल्लागार समितीवर सदस्य म्हणून महाराष्ट्रातील साखर…

उसापासून निर्मित डांबराचा रस्ता, गडकरींच्या हस्ते लोकार्पण

NITIN GADKARI BIO BITUMEN ROAD

नागपूर: ऊस, धान, मका आदींच्या टाकाऊ घटकांपासून (बायोवेस्ट) डांबरी रस्त्याप्रमाणेच उत्तम रस्ता तयार करण्यात आला असून, त्याचे उद्‌घाटन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केले. नागपूर जिल्ह्यातील मनसरजवळ बांधण्यात आलेला भारतातील हा पहिला बायो-बिटुमेन निर्मित (लिग्निन टेक्नॉलॉजी) रस्ता आहे.…

सिद्धी शुगरचे चेअरमन बाबासाहेब पाटील नवे सहकारमंत्री

Babasaheb Patil, Cooperation Minister

मुंबई : साखर उद्योगाचे नियंत्रण असणाऱ्या सहकार खात्याचे नवे मंत्री म्हणून आमदार बाबासाहेब पाटील यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) अहमदपूरचे (जि. लातूर) आमदार असून, ६६ वर्षांचे आहेत. त्यांचा नुकताच म्हणजे ५ डिसेंबर रोजी वाढदिवस…

साखर कारखान्यांना चार हजार कोटींची मदत : मुरलीधर मोहोळ

Muralidhar Mohol, Central Minister

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांना मोदी सरकारकडून आतापर्यंत थेट चार हजार कोटी रुपयांचे अर्थसाह्य विविध स्वरूपात करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. लोकसभेत खा. सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांला ते शुक्रवारी…

महाराष्ट्रात १०२ लाख टन साखर उत्पादनाचा ‘विस्मा’चा अंदाज

Wisma

पुणे : महाराष्ट्रातील सध्या सुरू असलेल्या ऊस गळीत हंगामात १०२ लाख टनापर्यंत साखरेचे उत्पादन होण्याच्या अंदाज ‘विस्मा’ने (वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन) व्यक्त केला आहे.‘विस्मा’ची बैठक नुकतीच बी. बी. ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली असता साखर उत्पादनाचे सुधारित अंदाज घोषित…

इथेनॉल दरवाढ सामान्य असणार, तर खरेदीत सह. कारखान्यांनाच प्राधान्य

ETHANOL PRICE HIKE

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या अख्त्यारित असलेल्या पेट्रोलियम कंपन्यांनी इथेनॉल खरेदीसाठी सहकारी साखर कारखान्यांना प्राधान्य द्यावे, अशा सूचना सरकारने केल्या आहेत, शिवाय इथेनॉल दरवाढ प्रलंबित ठेवल्याने साखर उद्योग डोळे विस्फारून केंद्राकडे पाहात आहे. केंद्राने तेल विपणन कंपन्यांच्या (OMC) निविदा दस्तऐवजात…

ट्रॅक्टरने केला घात, गाढ झोपलेले ऊसतोड मजूर पती-पत्नी ठार

tractor accident pune

पुणे : ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर उसतोड मजुरांच्या कोपीत शिरल्याने कोपीत झोपलेले पती-पत्नी जागीच ठार झाले. निर्वी (ता. शिरूर) येथील शिवारात १६ रोजी पहाटे ही घटना उघडकीस आली. गणपत कचरू वाघ (वय ४६) आणि शोभा गणपत वाघ (वय ४१, दोघेही…

Select Language »