Tag sugar industry

पुणे जिल्‍ह्यातील पारगावमध्ये एका उसाला तब्बल ४३ कांडे

जुन्नर (पुणे ) : जुन्नर तालुक्यातील पारगावतर्फे आळे येथील प्रगतशील शेतकरी विक्रम तट्टू यांनी ऊस शेतीत नवा आदर्श निर्माण केला आहे. आपल्या ३ एकर शेतात त्यांनी ८६०३२ जातीच्या आडसाली उसाचे भरघोस उत्पादन घेतले असून, एका उसाची लांबी तब्बल ४३ कांड्यांपर्यंत पोहोचली…

उसाची काटामारी, अपघात रोखण्यासाठी यूपी सरकार ॲक्शन मोडवर; नवे नियम लागू 

लखनऊ : उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक थांबवण्यासाठी आणि वाहतुकीदरम्यान होणारे अपघात टाळण्यासाठी राज्य सरकारने नुकतीच कडक पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस खरेदी आणि वाहतुकीबाबत नियमावली अधिक कडक करण्यात आली आहेत. काय आहेत नवे कडक नियम?…

माणुसकीला काळिमा! : ऊसतोड कामगाराचा मृत्यू, पण मुकादमाची अंत्यविधीसाठीही अमानुष अट!

औंढानागनाथ : पोटाची खळगी भरण्यासाठी ऊस तोडणीचे कष्ट उपसणाऱ्या एका मजुराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मात्र, या दु:खद प्रसंगातही माणुसकी विसरलेल्या एका मुकादमाने मृताच्या नातेवाईकांना अंत्यविधीसाठी जाण्यापासून रोखल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. “आधी अंत्यविधी करा आणि लगेच कामावर परत…

उसाची मोळी नेताना बांधावरून पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत

Sugarcane Cultivation

कोल्‍हापूर : शेतात काम करत असताना काळाने घाला घातल्याची धक्कादायक घटना राधानगरी तालुक्यातील घोटवडे येथे घडली आहे. उसाची मोळी डोक्यावरून वाहून नेताना बांधावरून तोल गेल्याने संजय भरत कोळी (वय ४२) या तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. नेमकी घटना काय?संजय कोळी…

ऊसतोड मजुरांचा ७५ हजारांचा ऐवज चोरट्यांकडून लंपास

कराड : येथील जवळपास चार ते पाच ऊसतोडणी मजुरांच्या खोपीतून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना नुकतीच नांदगाव येथील मुक्तेश्वर माळ परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  शरद…

पाटण तालुक्यात तब्बल ७० एकर उसाला भीषण आग

पाटण : तालुक्यातील खिलारवाडी येथील तब्बल ७० एकरातील ऊस भीषण आग लागल्याने खाक झाल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. या आगीत १९ शेतकऱ्यांचे सात ते आठ लाखांचे नुकसान अतोनात नुकसान झाले आहे. किशोर पवार, तुकाराम पवार, रमेश पवार, सचिन नलावडे,…

ऊसतोड मजुरांच्या खोपटांवर दरोडा; १२ मोबाईल लंपास

करवीर : कोल्हापूर-गारगोटी मार्गावरील निगवे खालसा येथे चोरट्यांनी ऊसतोड मजुरांना लक्ष करत एकाच रात्रीत १२ मोबाईल चोरून नेल्‍याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.शनिवारी  (दि. २०) मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या २-३ चोरट्यांनी मजुरांच्या खोपटात घुसून सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल लांबविला. एका मजुराला चाकूचा…

पाटण तालुक्यात आगीचे तांडव! ७० एकर ऊस जळून खाक

burned Sugarcane field

सातारा : पाटण तालुक्यातील खिलारवाडी परिसरात शुक्रवारी दुपारी आगीची एक भीषण घटना घडली. खिलारवाडी नजीकच्या तामचीवाडा शिवारात लागलेल्या या आगीत तब्बल ७० एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला असून, यामुळे शेतकऱ्यांचे ८ ते १० लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले…

ऊस ट्रक-दुचाकीच्या धडकेत दोन तरुण ठार

पाथर्डी : तालुक्यातील मिरी येथे पांढरीपूल-शेवगाव रस्त्यालगत उसाने भरलेल्या एका भरधाव रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला जोरदार धडक बसली. यात दोन तरुण जागीच ठार झाले आहे. गणेश किसनराव वाघ (३९) आणि तेजस देविदास जगताप (१९, दोघेही रा. मिरी, ता. पाथर्डी)…

राज्यात आतापर्यंत ३३६ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण

पुणे : १ नोव्हेंबर २०२५ पासून राज्यात ऊस गाळप हंगामाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत राज्यात सद्यस्थितीत ३३६ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झालेले आहे. तर ८.२७ टक्के निव्वळ साखर उताऱ्यानुसार २७ लाख ८३ हजार मेट्रिक टन नवे साखर उत्पादन…

Select Language »