Tag sugar mills

…अन्यथा, ‘जरंडेश्वर’विरोधात जनआंदोलन करणार

कुमठे गावच्या सरपंचांसह ग्रामस्थांचा इशारा अहिल्यानगर : जरंडेश्वर शुगर मिल आपले मळीमिश्रित पाणी व डिस्टिलरीतील टाकाऊ रासायनिक पाणी तिळगंगा नदीत सोडून कुमठे गावच्या ग्रामस्थांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण करून खेळ खेळत आहे. हा खेळ रोखण्याची माझी लोकनियुक्त सरपंच या नात्याने…

इतर कारखान्यास ऊस दिल्यास सवलती बंद करणार : जगताप

Someshwar Sugar

बारामती :  ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी कारखान्याकडे नोंद केलेला ऊस संमतीशिवाय इतर कारखान्यास दिल्यास साखर, ऊस रोपे, ऊस बियाणे, ताग, सोयाबीन बियाणे, कंपोस्ट खत आदी सवलती बंद करण्यात येणार आहेत. हार्वेस्टर ऊस तोडणी करण्याकरिता प्राधान्य देण्यात आल्याने सभासदांनी शेतात किमान…

शेतकऱ्यांना चांगला भाव देण्यास कारखाना कटिबद्ध : थोरात

अहिल्यानगर : शेतकऱ्यांना चांगला भाव देण्यासाठी कारखाना कायम कटिबद्ध आहे. ऊस वाढ योजनेअंतर्गत एकरी शंभर टनापेक्षा जास्त ऊस उत्पादन करणे आणि ऊस लागवडीचे नियोजन करणे हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. वाघापूर (ता. संगमनेर)…

सोलापुरातील साखर उद्योजकांसाठी खुशखबर!

साखरेचा माल देशाच्या विविध भागांत रेल्वेने पाठवता येणार सोलापूर : सोलापूर हा राज्यातील अग्रगण्य साखर उत्पादन करणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथे दरवर्षी लाखो टन साखरेचे उत्पादन घेतले जाते.  या धोरणात्मक विकासामुळे येथील रेल्वे स्टेशनच्या १५ ते २० किलोमीटर परिसरातील…

केंद्राकडून जूनचा साखर विक्रीचा कोटा जाहीर

Sugar Production

पुणे :  बाजारात साखरेला मागणी नसल्याने मे महिन्याच्या कोट्यातील सुमारे ५० हजार टन साखर अद्याप कारखान्यांकडे शिल्लक आहे. बाजारातील साखरेचे दर नियंत्रित राहावे, यासाठी साखर कारखान्यांना साखर विक्रीसाठी केंद्र सरकार महिन्याला कोटा देत असते. केंद्र सरकारने जून महिन्यातील साखर विक्रीचा…

पाडेगाव ऊस संशोधनला आंतरराष्ट्रीय स्तराचे केंद्र बनविणार

Manikrao Kokate

राज्याचे कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांचे प्रतिपादन अहिल्यानगर : पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे बळकटीकरण करून आंतरराष्ट्रीय स्तराचे केंद्र बनविणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी केले. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठअंतर्गत पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राला…

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा : रविकांत तुपकर

लातूर : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीप्रश्नी शेतकरी नेते रविकांत तुपकर हे आता आक्रमक होताना दिसत आहे. यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी शेतकरी मेळाव्यांचे आयोजन केले आहे. यानिमित्त ते लातुरात आले असता येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.…

*समृद्धी* शेतकऱ्यांच्या विश्वासावर उभा असल्याचा अभिमान : घाटगे

जालना : घनसावंगी येथील समृद्धी साखर कारखाना हा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या विश्वासावर उभा असून तो सर्वसामान्य शेतकऱ्यांचा कारखाना म्हणूनच तो चालविला जातो. याचा आम्हाला अभिमान असल्याचे समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी सोमवारी सांगितले. तसेच समृद्धी कारखान्याकडून पहिला हप्ता २५००…

ट्वेंटीवन शुगर्समध्ये करिअरची सुवर्णसंधी!

Twenty One Sugar

लातूर: मळवटी येथील ट्वेंटीवन शुगर्स लि. मध्ये कुशल मुला-मुलींसाठी नवीन करिअर सुरू करण्याची सुवर्णसंधी कारखाना प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे. कारखान्याच्या मालकीचे ऊस तोडणी मशीन (हार्वेस्टर) व इन्फिल्डर या पदासाठी कंत्राटी पद्धतीने त्वरित जागा भरावयाच्या आहेत. इच्छुक पात्रताधारक उमेदवारांनी आपले…

हक्काच्या पैशासाठी पैनगंगा कारखान्यावर जनआक्रोश…!

बुलढाणा : कारखान्याने मोठमोठे आमिष दाखवून शेतकऱ्यांचा ऊस आणला. उसाची साखर केली, साखरेचे करोडो रुपये वसूल केले; परंतु शेतकऱ्यांचे करोडो रुपये गेल्या ५ महिन्यांपासून थकीत आहेत, या पैशांसाठी कारखान्यावर हेलपाटे मारूनही कारखाना प्रशासन दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्‍या जवळपास…

Select Language »