Tag sugarcane news

ओव्हरलोड ऊस वाहतुकीला आळा घाला, अन्यथा कारखान्यांवर कारवाई

Sugarcane Crushing

अहिल्यानगर : जिल्ह्यातील धोकादायक आणि ओव्हरलोड ऊस वाहतुकीमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी साखर कारखानदारांना कठोर इशारा दिला आहे. “ओव्हरलोड वाहतुकीला प्रोत्साहन देणाऱ्या कारखान्यांनाही आता जबाबदार धरले जाईल,” असे स्पष्ट करत त्यांनी तातडीने सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत.…

पुणे जिल्‍ह्यातील पारगावमध्ये एका उसाला तब्बल ४३ कांडे

जुन्नर (पुणे ) : जुन्नर तालुक्यातील पारगावतर्फे आळे येथील प्रगतशील शेतकरी विक्रम तट्टू यांनी ऊस शेतीत नवा आदर्श निर्माण केला आहे. आपल्या ३ एकर शेतात त्यांनी ८६०३२ जातीच्या आडसाली उसाचे भरघोस उत्पादन घेतले असून, एका उसाची लांबी तब्बल ४३ कांड्यांपर्यंत पोहोचली…

चंदगडमध्ये ऊसउत्पादकांची ३० कोटींची लूट; ‘स्वाभिमानी’ आक्रमक

चंदगड: ऊसतोडणी आणि वाहतुकीच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून बेकायदेशीरपणे वसूल केली जाणारी ‘खुशाली’ थांबवावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चंदगड तालुक्यातील कारखान्यांना इशारा दिला आहे. या लुटीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी सुमारे ३० कोटी रुपयांचा फटका बसत असल्याचा खळबळजनक आरोप संघटनेने केला आहे.…

राज्यातील गाळप हंगाम अपडेट्‌स!

sugar industry new rules

पुणे : चालू गाळप हंगाम २०२५-२६ मधील महाराष्ट्रातील नोंदणीकृत साखर कारखान्यांचा २६ डिसेंबर २०२५ अखेरचा विभागनिहाय प्राप्त गाळप अहवाल खालीलप्रमाणे…..

उसाची काटामारी, अपघात रोखण्यासाठी यूपी सरकार ॲक्शन मोडवर; नवे नियम लागू 

लखनऊ : उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक थांबवण्यासाठी आणि वाहतुकीदरम्यान होणारे अपघात टाळण्यासाठी राज्य सरकारने नुकतीच कडक पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस खरेदी आणि वाहतुकीबाबत नियमावली अधिक कडक करण्यात आली आहेत. काय आहेत नवे कडक नियम?…

ऊस व्यवस्थापन मेळाव्यास शेतकऱ्यांचा प्रतिसाद

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास ऊस शेती फायदेशीर ः  माजी आमदार धोंडे बीड : आष्टी तालुक्यातील कडा येथील महेश सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आयोजित केलेल्या ‘योग्य ऊस व्यवस्थापन’ या विषयावरील भव्य मेळाव्यास शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. या मेळाव्याला माजी आमदार…

एकरी १८० टन ऊस उत्पादनाचा विक्रम!

Sugarcane co-86032

कुडची (बेळगाव) : आधुनिक तंत्रज्ञान आणि चिकाटीच्या जोरावर कुडची येथील प्रगतशील शेतकरी नईमुद्दिन पिंतोड यांनी एका एकरात १८० टन उसाचे विक्रमी उत्पादन घेण्याची किमया साधली आहे. त्यांचा हा २६ फूट लांब आणि ५५ कांड्यांचा ऊस पाहण्यासाठी सध्या परिसरातून शेतकऱ्यांची मोठी गर्दी…

थंडीच्या कडाक्याने गुळाचा गोडवा वाढला!

jaggery Market

सोलापूर: संपूर्ण राज्यासह सोलापूर जिल्ह्यात थंडीचा जोर वाढताच तीळवड्या, लाडू आणि चिक्की यांसारख्या पारंपरिक पदार्थांना ग्राहकांची पसंती मिळत आहे. या वाढत्या मागणीमुळे बाजारात गुळाचे दर वधारले असून, आरोग्याबाबत जागरूक असलेले ग्राहक साखरेऐवजी गुळाला पसंती देत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.काय…

‘कृष्णा’ला राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार जाहीर

krishna sugar Award

‘व्ही.एस.आय.’ कडून घोषणा; सभासदास राज्यस्तरीय ऊसभूषण पुरस्कार कराड : पुणे जिल्ह्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्ही.एस.आय.) या संस्थेच्या वतीने साखर क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरीबद्दल दिले जाणारे यंदाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील य. मो. कृष्णा…

हर्षवर्धन पाटलांच्या साखर कारखान्याला ११.२२ कोटींचा दंड

Harshwardhan Patil Sugar Mill Fined defying sugarcane crushing rules

पुणे : ऊस गाळप हंगाम २०२५-२६ चा परवाना मिळण्याआधीच गाळप सुरू केल्याचा ठपका साखर आयुक्तालयाने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कारखान्यावर ठेवून मोठा दंड ठोठावला आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष असलेले हर्षवर्धन पाटील यांच्या शंकररावजी पाटील सहकारी साखर…

Select Language »