शाहू साखर कारखान्यात भरती जाहीर

कोल्हापूर : जिल्ह्यातील कागल येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना लि. येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. कारखान्याच्या श्रीमंत जयसिंगराव घाटगे भवनातून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
कारखान्यात सुमारे १५०० मेट्रिक टन ऊस गाळप क्षमता, ३६ मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प तसेच ७५ हजार केएलपीडी क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प कार्यरत आहे. या पार्श्वभूमीवर अनुभवी आणि पात्र उमेदवारांची गरज भासल्याने ही भरती जाहीर करण्यात आली आहे.
उपलब्ध पद:
- एच. आर. (मॅनेजर) – १ पद
शैक्षणिक पात्रता व अनुभव:
संबंधित पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर तसेच एमएसडब्ल्यू (MSW) किंवा एमबीए (HR) पदवी आवश्यक आहे. साखर कारखान्यात किमान १५ वर्षांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
अर्ज प्रक्रिया:
इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १० दिवसांच्या आत प्रत्यक्ष किंवा md@shahusugar.com ई-मेलद्वारे सादर करावेत.
या भरती प्रक्रियेसाठी कारखान्याचे अध्यक्ष श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे, उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे आणि कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.




