स्वामी समर्थ शुगर अँड अ‍ॅग्रोमध्ये भरती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

अहिल्यानगर : माळवाडी-दुमाला, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर येथील स्वामी समर्थ शुगर अँड अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड या प्रतिदिन २,५०० मेट्रिक टन ऊस गाळप क्षमता आणि १२ मेगावॅट को-जनरेशन प्रकल्प असलेल्या साखर कारखान्यात विविध पदांसाठी पात्र व अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

इंजिनिअरिंग विभागातील पदे

असिस्टंट इंजिनिअर, बॉयलिंग हाऊस फिटर ‘ए’ ग्रेड, सेंट्रिफ्युगल फिटर ‘ए’ ग्रेड, मिल फिटर ‘ए’ व ‘बी’ ग्रेड, मिल डीसीएस ऑपरेटर, फिडर टेबल ऑपरेटर, टिपलर ऑपरेटर, क्रेन ऑपरेटर, टर्बाइन अटेंडंट, टर्बाइन ऑइलमन, इन्स्ट्रुमेंट टेक्निशियन, बॉयलर डीसीएस ऑपरेटर, बॉयलिंग हाऊस डीसीएस ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन, स्विच बोर्ड ऑपरेटर, वर्कशॉप फोरमन आणि डब्ल्यूटीपी ऑपरेटर या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

या पदांसाठी दहावी, बारावी, आयटीआय, संबंधित ट्रेडमधील डिप्लोमा अथवा अभियांत्रिकी पदवीसह पदानुसार पाच ते दहा वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

उत्पादन विभागातील पदे

उत्पादन विभागात डेप्युटी चीफ केमिस्ट, कॉन्टिन्युअल मेट, एफएफई हँड ऑपरेटर, ऑलिमेन्ट, बॅच टाइप मशीन ऑपरेटर, सेंट्रिफ्युगल ‘बी’ व ‘सी’ मशीन ऑपरेटर आणि ईटीपी ऑपरेटर या पदांसाठी संधी उपलब्ध आहे.

डेप्युटी चीफ केमिस्ट पदासाठी बी.एस्सी./एम.एस्सी. रसायनशास्त्रासह VSI/NSI पात्रता आणि १० ते १५ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. इतर पदांसाठी दहावी किंवा बारावी, VSI अभ्यासक्रम अथवा संबंधित कामाचा पाच ते दहा वर्षांचा अनुभव अपेक्षित आहे.

फ्रेशर्सनाही संधी

सिव्हिल विभागातील ट्रेनी सिव्हिल इंजिनिअर पदासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवीधारक उमेदवार अर्ज करू शकतात. या पदासाठी फ्रेशर्सचाही विचार केला जाणार आहे.

अर्ज कसा करावा?

इच्छुक उमेदवारांनी आपले संपूर्ण नाव, पत्ता, शैक्षणिक पात्रता, जन्मतारीख, अनुभवाचे प्रमाणपत्र, अपेक्षित वेतन, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल पत्ता यांसह अर्ज करावा. अर्जाच्या विषयामध्ये संबंधित पदाचे नाव नमूद करून जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसांच्या आत अर्ज खालील ई-मेलवर पाठवावा.

ई-मेल : hr.sssail01@gmail.com
पत्ता : माळवाडी-दुमाला, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर – 414603.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »