शिवाजीराव अॅग्रो इंडस्ट्रीजमध्ये २८ जागांसाठी भरती

पैठण : तालुक्यातील डेरा-नांदर येथील शिवाजीराव अॅग्रो इंडस्ट्रीज प्रा. लि.च्या २५० टीसीडी गाळप क्षमतेच्या गूळ पावडर कारखान्यात इंजिनिअरिंग आणि उत्पादन विभागातील विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण २८ जागांसाठी पात्र आणि अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
इंजिनिअरिंग विभागात १३ जागा
इंजिनिअरिंग विभागात असिस्टंट इंजिनिअर (मेकॅनिकल), इलेक्ट्रिशियन, पॉवर टर्बाइन अटेंडंट, सेंट्रिफ्युगल फिटर ‘ए’ ग्रेड, वायरमन ‘ए’ व ‘बी’ ग्रेड, मिल फिटर ‘बी’ ग्रेड, केन अनलोडर ऑपरेटर, बॉयलिंग हाऊस ‘बी’ ग्रेड फिटर आणि इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/डीसीएस ऑपरेटर या पदांचा समावेश आहे.
या पदांसाठी बी.ई., डिप्लोमा किंवा संबंधित ट्रेडमधील आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे.
उत्पादन विभागात १५ जागा
उत्पादन विभागात मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट, लॅब केमिस्ट, पॅन इन्चार्ज, पॅनमन, शुगर हाऊस क्लार्क, सेंट्रिफ्युगल मेट, सेंट्रिफ्युगल ऑपरेटर, ऑनलाइन मेट, सल्फिटेशन मेट, ईटीपी केमिस्ट आणि ईटीपी ऑपरेटर या पदांसाठी भरती केली जाणार आहे.
पदानुसार बी.एस्सी./एम.एस्सी. रसायनशास्त्र, पर्यावरणशास्त्र, पॅन बॉयलिंग अभ्यासक्रम, बारावी किंवा पदवी अशी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.
तीन ते पाच वर्षांचा अनुभव आवश्यक
प्रत्येक पदासाठी संबंधित क्षेत्रातील किमान तीन ते पाच वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाच्या प्रमाणपत्रांच्या प्रती स्कॅन करून जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसांच्या आत अर्ज पाठवावा.
ई-मेल : ID-hr@shivajiraoagroind.com
अर्ज ई-मेलद्वारे किंवा जाहिरातीत दिलेल्या इंजिनिअरिंग व उत्पादन विभागाच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवता येणार आहे. अर्ज स्वीकारणे किंवा नाकारणे, पदांची संख्या कमी-जास्त करणे अथवा भरती प्रक्रियेत बदल करण्याचे अधिकार व्यवस्थापनाने राखून ठेवले आहेत.




