माळेगाव कारखान्यात विविध पदांसाठी भरती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक (शिवनगर) येथील दि माळेगाव सहकारी साखर कारखाना लिमिटेडने मॅन्युफॅक्चरिंग आणि डिस्टिलरी विभागातील विविध रिक्त पदांसाठी अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत.

मॅन्युफॅक्चरिंग विभागात सिनिअर मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट आणि ज्यूस सुपरवायझर, तर डिस्टिलरी विभागात डिस्टिलरी मॅनेजर आणि बायोगॅस केमिस्ट या पदांसाठी प्रत्येकी एक जागा उपलब्ध आहे. संबंधित पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रतेसह साखर कारखाना किंवा संबंधित विभागातील कामाचा अनुभव अनिवार्य करण्यात आला आहे. सीबीजी प्रकल्पाच्या इरेक्शन व कमिशनिंगचा अनुभव असलेल्या डिस्टिलरी मॅनेजर पदाच्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसांच्या आत आपला अर्ज प्रत्यक्ष किंवा ई-मेलद्वारे कारखाना प्रशासनाकडे पाठवावा. अर्जासोबत अनुभव प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे, सध्याचा पगार आणि अपेक्षित पगार यांची माहिती जोडणे आवश्यक आहे. जाहिरातीनुसार संबंधित पदांसाठी अनुभवी पुरुष उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार असून मागासवर्गीय उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
अर्ज व अधिक माहितीसाठी malegaonsugar@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधता येईल.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »