Tag sugar industry news

सावधान! कारखान्यांनी कचरा पाण्यात सोडल्यास खैर नाही

लोकायुक्तांचे कडक निर्देश; कचरा विल्हेवाटीचे नियम लागू मुंबई : साखर कारखान्यांमधून बाहेर पडणारा रासायनिक कचरा (केमिकल वेस्ट) शेतजमीन किंवा पाण्याच्या स्त्रोतांमध्ये सोडता कामा नये, असे स्पष्ट निर्देश लोकायुक्त विद्याधर कानडे यांनी दिले आहेत. रासायनिक कारखान्यांप्रमाणेच साखर कारखान्यांनाही कचरा विल्हेवाटीचे नियम…

साखर आयुक्तालयात पदांचा दुष्काळ

Sakhar Sankul

५० पदेरिक्त असल्याने कामकाजाचा बोजवारा, पदभरतीचे मोठे आव्हान पुणे: राज्यातील साखर उद्योगाचे नियंत्रण करणाऱ्या पुणे येथील साखर आयुक्तालयाला सध्या भीषण मनुष्यबळ टंचाईचा सामना करावा लागत आहे. सूत्रांच्या अधिकृत माहितीनुसार, दोन सहायक संचालकांसह एकूण ५० पदे रिक्त असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा…

भाऊसाहेब थोरातांचे कार्य समाजविकासासाठी दीपस्तंभ : थोरात

संगमनेर: “स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकार, शेती, शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रात दिलेले योगदान अजरामर आहे. त्यांचे तत्त्वनिष्ठ जीवन आणि समाजहित जपण्याचे कार्य पिढ्यानपिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल,” असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. संगमनेर येथील सहकारमहर्षी…

उसाच्या ट्रॉलीखाली दबून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

म्हसवड: कुकुडवाड-मायणी रस्त्यावर ऊस भरलेल्या ट्रॅक्टरची पिन निघून दोन ट्रॉली उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात एका ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री नऊच्या सुमारास कुकुडवाडपासून दीड किलोमीटर अंतरावर घडली. सूरज संजय माने (रा. म्हसवड) असे मृताचे नाव आहे. अपघातानंतर जखमीला…

बीडच्या ऊसतोड मजूर कुटुंबाचे कर्नाटकवरून अपहरण

बीड: ऊसतोडीसाठी कर्नाटक राज्यात गेलेल्या बीडमधील एका मजुराच्या कुटुंबाचे अपहरण करून त्यांना सांगली जिल्ह्यात डांबून ठेवल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे  आकाश भिसे (रा. बीड), त्यांची पत्नी मेघा भिसे, दोन लहान मुली आणि बहीण शीतल ढोबळे असे या कुटुंबाचे नाव आहे.…

पंचगंगा कारखान्याच्या चेअरमनपदी पी. एम. पाटील

Panchaganga sugar ssk

इचलकरंजी (गंगानगर): हातकणंगले तालुक्यातील ‘देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्या’च्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया नुकतीच पार पडली. यामध्ये चेअरमनपदी कबनूरचे पी. एम. पाटील आणि व्हाईस चेअरमनपदी शिरोळचे प्रताप ऊर्फ बाबा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे पंचगंगा कारखान्याच्या पुढील…

सोमेश्वर कारखान्याचा महत्त्वपूर्ण निर्णय : विनाकपात ऊसबिले अदा करणार

Someshwar Sugar

बारामती : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गाळप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या हिताचा मोठा निर्णय घेतला आहे. कारखान्याचा रास्त आणि किफायतशीर दर (FRP) ३२८५ रुपये प्रति मेट्रिक टन इतका असताना, संचालक मंडळाने प्रथम हप्त्यापोटी ३,३०० रुपये प्रति टन इतके अधिक दर…

थकीत ऊस बिलावरून कळंबच्या गूळ कारखान्यांना आंदोलनाचा इशारा

RAJU SHETTI

कळंब: साखर कारखान्यांप्रमाणे वेळेत देयके न देणाऱ्या कळंब तालुक्यातील गूळ पावडर कारखान्यांविरोधात आता शेतकरी आक्रमक झाले आहेत. थकीत देयकांमुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले असून, याप्रश्नी माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्वतः लक्ष घातले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखानदारांना आंदोलनाचा इशारा…

ऊसतोड मजूर पुरवठा करण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची फसवणूक

इस्लामपूर(ईश्वरपूर) : ऊसतोडणी मजुरांच्या टोळ्या पुरवण्याचे आमिष दाखवून कामेरी (ता. वाळवा) येथील एका व्यावसायिकाला ८ लाख ४५ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संशयित आरोपी मोहन जयसिंग राठोड (रा. बाराकोटी तांडा, जि. विजापूर) याच्यावर ईश्वरपूर पोलीस ठाण्यात…

बिबट्याची दहशत : शेतकऱ्याने स्वतःच पेटवून तोडला ऊस

शिराळा : तालुक्यातील उपवळे परिसरात बिबट्याचा वावर आणि अलीकडेच एका नऊवर्षीय बालिकेवर झालेल्या हल्ल्यामुळे ऊसतोड मजुरांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. मजुरांनी ऊस तोडण्यास नकार दिल्याने, अखेर ऊस शेतातच राहू नये म्हणून शेतकरी दिलीप पाटील यांना आपला उभा ऊस पेटवून तोडण्याची…

Select Language »