Tag sugar industry news

आहेर यांना अभिनेत्री स्मिता पाटील काव्य पुरस्कार

AHER AWARDED

नाशिक – साखर उद्योगातील तज्ज्ञ आणि सिद्धहस्त कवी श्री. वाळू रघुनाथ आहेर (नाशिक) यांच्या अंतरीचे बोल या काव्य संग्रह पुस्तकास गिरणा गौरव प्रतिष्ठानचा अभिनेत्री स्मिता पाटील शब्दपेरा काव्य साहित्य पुरस्कार तिसऱ्या आखिल भारतीय शेकोटी साहित्य संमेलनात प्रदान करण्यात आला. श्री…

चिफ केमिस्ट आवरगंड यांचे निधन

Chief chemist Awargand

जालना : कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याचे (अंकुशनगर ता. अंबड जि. जालना) चिफ केमिस्ट विलास नामदेवराव आवरगंड यांचे दुःखद निधन झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो… ‘शुगरटुडे’ मासिकाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

अजितदादांच्या साखर कारखान्यांना खा. सुप्रिया सुळे यांचे सवाल

Supriya Sule MP

‘माळेगाव’, ‘सोमेश्वर’वर बैठका; मात्र अध्यक्ष गैरहजर पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व असलेल्या माळेगाव व सोमेश्वर साखर कारखान्यास खासदार सुप्रिया सुळे यांनी उसाच्या पहिल्या उचलीच्या मागणीसाठी ११ रोजी भेटी दिल्या; पण अध्यक्ष व उपाध्यक्षांसह कारखान्याच्या संचालकांनीही यावेळी उपस्थित राहणे…

‘भीमाशंकर’वरून निकमांचे शब्दबाण, बेंडे यांचाही प्रतिहल्ला

Bhimashankar Sugar

पुणे : विधानसभा निवडणूक संपली तरी आंबेगावचे आमदार आणि ज्येष्ठ नेते दिलीपराव वळसे पाटील आणि त्यांचे प्रतिस्पर्धी देवदत्त निकम यांच्यातील शीतयुद्ध सुरूच आहे. वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यपद्धतीवर नुकतेच शब्दबाण सोडले, तर त्याला कारखान्याचे अध्यक्ष…

‘पंचगंगा’ची निवडणूक बिनविरोध, विरोधक कोर्टात आव्हान देणार

Panchaganga sugar ssk

कोल्हापूर : अर्ज माघारीच्या दिवशी ‘अ’ वर्ग ऊस उत्पादक सभासद गटातून २४ उमेदवारांपैकी १२ जणांनी माघार घेतल्यानंतर, देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२०३० सालची संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली.संचालकांच्या एकूण १७ जागांसाठी पी. एम. पाटील गटाचे १७…

शेतकुंपणाकरिता स्वतंत्र योजना तयार करा – सहकारमंत्री पाटील

MCED, Ajitdada pawar

पुणे – वन्यप्राण्यापासून शेतकऱ्यांची पिके आणि फळबागांचे संरक्षण होण्यासाठी शेतकुंपण करण्याकरीता स्वतंत्र योजना तयार करुन शासनास सादर करावी, अशी सूचना राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गुरुवारी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळास केली.महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या साखर संकुल येथे झालेल्या संचालक…

253 हार्वेस्टरचे लाभार्थ्यांना वितरण

Sugarcane Harvester

पुणे : केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या हार्वेस्टर अनुदान योजनेअंतर्गत आजतागायत २५३ हार्वेस्टर यंत्रांची खरेदी पूर्ण होऊन त्याचे संबंधितांना वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली. या योजनेअंतर्गत एकूण नऊशेवर हार्वेस्टर खरेदीचे…

साखरेचा वापर 28 दशलक्ष टन राहण्याची शक्यता : इस्मा

sugar production increase

नवी दिल्ली : 2024-25 वर्षात (Sugar Year) भारताचा साखरेचा वापर 28 दशलक्ष टन राहण्याचा अंदाज आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 1.5 दशलक्ष टनांनी कमी आहे. इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ISMA) च्या आकडेवारीनुसार, या वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांसाठी…

साखरेची एमएसपी वाढवायची की नाही याचा लवकरच फैसला

sugar Jute Bags

नवी दिल्ली : साखरेच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ करायची की नाही, याबाबत सरकार लवकरच निर्णय घेणार असल्याचे केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोमवारी सांगितले.२०१९ पासून साखरेची एमएसपी 31 रुपये प्रति किलो या दराने कायम आहे,…

साहेबराव खामकर यांची नियुक्ती

Sahebrao Khamkar

पुणे – सहकार भारती या संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश चे साखर कारखाना प्रकोष्ठ प्रमुख म्हणून साखर ऊद्योगाचे अभ्यासक साहेबराव खामकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सहकार भारतीचे शिर्डी येथे पार पडलेल्या त्रैवार्षिक अधिवेशना मध्ये त्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. सहकार भारती ही…

Select Language »