Tag sugarcane news

खळबळजनक : ७० लाखांच्या थकबाकीतून ऊसतोड मुकादमाचे अपहरण

धारूर: कामगारांच्या थकबाकीच्या वादातून एका ऊसतोड मुकादमाला साखर कारखान्याच्या लोकांनी पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धारूर तालुक्यातील कासारी बोडखा येथील दादासाहेब बडे असे अपहरण झालेल्या मुकादमाचे नाव असून, या घटनेमुळे ऊसतोड कामगार आणि मुकादमांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.…

सामाजिक बांधिलकी : ‘कृष्णा’चा ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाला आधार

krishna sugar Award

कराड : पोटाची खळगी भरण्यासाठी शेकडो किलोमीटरवरून येणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी, रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने मायेचा हात पुढे केला आहे. कारखान्याने आपल्या परिसरातील चार ‘साखर शाळां’मधील २६५ विद्यार्थ्यांना मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करून…

‘शिसाका’ आता ‘माँ-रेवा शुगर्स’कडे!

Shripur sugar factory

शिरपूर : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना (शिसाका) अखेर पूर्ववत सुरू होण्याच्या मार्गावर आहे. मध्य प्रदेशातील मे. माँ-रेवा शुगर्स प्रा.लि. यांनी हा कारखाना २० वर्षांच्या भाडेतत्त्वावर चालवण्यास घेतला असून, २०२६-२७च्या गळीत हंगामात कारखान्याची धुराडी पुन्हा पेटणार आहेत. ३० जानेवारी…

ऊस तोडणीसाठी गेलेल्या तरुणांना अमानुष मारहाण

बारामतीतील घटनेनंतर पीडित तरुण भयभीत बीड : मजुरीसाठी पश्चिम महाराष्ट्रात गेलेल्या केज तालुक्यातील दोन पारधी समाजाच्या तरुणांना १० ते १२ जणांनी अज्ञात ठिकाणी नेऊन बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंगावर मारहाणीचे गंभीर वळ आणि डोळ्यांत प्रचंड दहशत…

ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

अहिल्‍यानगर : नेवासा-शेवगाव राज्यमार्गावर शुक्रवारी रात्री झालेल्या एका भीषण अपघातात २१ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात कुकाणा येथील बाजार समितीसमोर रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडला. महेश मानशाराम कर्डिले (रा. जेऊर हैबती, ता. नेवासा)…

अवघ्या २७ गुंठ्यांत ८१ टन ऊस, पावणे तीन लाख कमावले!

Sugarcane co-86032

कराड  :  तालुक्यातील किवळ येथील प्रगतशील शेतकरी राम धरणे यांनी शेतीमध्ये अशक्य कोटीतील कामगिरी करून दाखवली आहे. त्यांनी अवघ्या २७ गुंठे जमिनीत ८६०३२ वाणाच्या उसाचे तब्बल ८१ टन उत्पादन घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या विक्रमी उत्पादनातून त्यांना २ लाख ८३ हजार ५०० रुपयांचे उत्पन्न मिळाले असून,…

सह्याद्री साखर कारखान्याचे ऐतिहासिक पाऊल

Balasaheb Patil, Sahyadri Sugar

११ हजार मेट्रिक टन गाळप क्षमतेचा विस्तार प्रकल्प कार्यान्वित सातारा : सहकार महर्षी पी. डी. पाटील यांचे स्वप्न आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेतून आकाराला आलेल्या ‘सह्याद्री’ साखर कारखान्याने विकासाचा नवा टप्पा गाठला आहे. कारखान्याचा नवीन विस्तारवाढ प्रकल्प सर्व…

ऊस गाळपात सोलापूर जिल्ह्याचा महाराष्ट्रात नवा विक्रम!

सोलापूर : अतिवृष्टी आणि महापुरासारख्या नैसर्गिक संकटांवर मात करत सोलापूर जिल्ह्याने यंदाच्या ऊस गाळप हंगामात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. जिल्ह्यातील ३४ साखर कारखान्यांनी तब्बल १ कोटी ३४ लाख १३ हजार ६३२ टन उसाचे गाळप करून राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे, साखर…

तोडणीअभावी शेकडो एकर ऊस फडावरच!

sugarcane field

स्थानिक कारखान्यांच्या सुस्त कारभारामुळे शेतकरी संकटात छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात यंदा ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात येत असतानाही शेकडो एकर ऊस अद्याप तोडणीच्या प्रतीक्षेत उभा आहे. जानेवारी महिना संपत आला तरी ‘सुरू’ (एक्का) उसाला अद्याप तोडणी मिळालेली नाही, त्यामुळे दुबार आणि…

ऊसतोड कामगारांच्या ओळखपत्रांचे काम कासव गतीने

sugarcane cutting

२१ कोटींचे टेंडर, पण नोंदणी फक्त ७७७ बीड: लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोडणी कामगार महामंडळांतर्गत कामगारांची नोंदणी आणि ओळखपत्र वाटपाचे काम बीड जिल्ह्यात अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे येथील एका खासगी कंपनीला २१ कोटी रुपयांचे कंत्राट…

Select Language »