ब्लॉग

निर्यात धोरण: यूपी – महाराष्ट्रामध्ये परस्परविरोधी मतप्रवाह

sugar production

1 ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या पुढील साखर हंगामासाठी निर्यात धोरणावरून उत्तर भारतीय साखर उद्योग आणि महाराष्ट्रासह, कर्नाटक, गुजरात या राज्यांमधील परस्परविरोधी मतप्रवाह आहेत. उत्तर प्रदेशातील साखर उद्योगाने मिलनिहाय निर्यात कोट्याचे वाटप करण्याची मागणी केली आहे; तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरातमधील साखर…

निर्यात परवान्याच्या आशेने साखर शेअर वधारले

SHARE MARKET

मुंबई – नवीन साखर हंगाम 1 ऑक्टोबर 2022 पासून सुरू होत आहे आणि साखर निर्यातीचा कोटा लवकरच वाटप केला जाईल किंवा जाहीर केला जाईल अशी अपेक्षा बाजारपेठा करत आहेत. त्यामुळे सरत्या आठवड्यात शेअर बाजारात साखर कंपन्यांचे शेअर वधारले. साखर उद्योग…

महाराष्ट्राला दहा पुरस्कार, शाहू कारखाना देशात सर्वोत्कृष्ट

sugar industry new rules

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे पुरस्कार जाहीर नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने (२०२१-२२) च्या पुरस्कारांची घोषणा केली आहे. कागलचा श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना देशात सर्वोत्कृष्ट ठरला असून, त्यास वसंतदादा पाटील पारितोषिक जाहीर झाले आहे. एकूण…

यंदा ८० लाख टन निर्यातीस परवानगी द्या : इस्मा

SUGAR stock

नवी दिल्ली – यावर्षी साखर उत्पादनात होणारी मोठी वाढ लक्षात घेऊन, किमान ८० लाख टन साखर निर्यातीला परवानगी द्यावी, अशी मागणी ‘ईस्मा’ने (इंडियन शुगर मिल्स असो.) केली आहे. या मागणीचे निवेदन संघटनेने केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांना दिले आहे. इस्माचे…

इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठल्यास एक लाख कोटी विदेशी चलनाची बचत

सूरत – मोदी सरकारने नोव्हेंबर, 2022 पर्यंत पेट्रोलमध्ये 10 टक्के एथेनॉल मिसळण्याचे लक्ष ठेवले होते. ते भारताने पाच महिन्यांपूर्वीच गाठले आहे. 20 टक्के मिश्रणाचे उद्दिष्ठ गाठल्यास देशाची अर्थव्यवस्था बदलेल, असे प्रतिपादन केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांनी केले. ‘सरकारने 20 टक्के…

ईलेक्ट्रिक व्हेइकलच्या जमान्यात इथेनॉलला भवितव्य काय?

ऑटोमोबाइल क्षेत्रात ईव्ही अर्थात ईलेक्ट्रिक व्हेइकलचा जगभर बोलबाला सुरू झाला असताना, इथेनॉलला इंधन म्हणून काय भवितव्य असेल, असा सवाल कोणालाही पडणारच. भारतासह अनेक देश बायोफ्युल इकॉनॉमीवर भविष्याचे आराखडे बांधत असताना, या क्षेत्राचे भवितव्य नेमके कसे असेल? कारच्या विद्युतीकरणाला चालना देण्यासाठी…

तुकडा तांदुळ निर्यात बंदीचे कारण इथेनॉल तर नाही ?

केंद्र सरकारने 8 सप्टेंबर 2022 रोजी तुटलेल्या तांदळाच्या (तुकडा तांदूळ) निर्यातीवर निर्बंध लादले. खरीप हंगाम आणि तांदळाच्या किमतीत झालेली वाढ यासह सरकारने असे का केले याविषयी अनेक सिद्धांत मांडले जात आहेत. पण काही तांदूळ निर्यातदारांच्या दाव्यानुसार, यामागचे कारण इथेनॉल आहे.…

गाळप परवाना देताना पगार थकीत नसल्याचा दाखला सक्तीचा करा

साखर कामगारांची आयुक्तांकडे मागणी पुणे :– राज्यातील साखर कारखान्यांना ऊस गाळप परवाना देतांना पगार थकीत नसल्याचा दाखला सक्तीचा करावा,खाजगी साखर कारखान्यांना त्रिपक्ष समिती कराराची अंमलबजावणी केल्याशिवाय  गाळप परवाना देऊ नये आणि पेमेंट ऑफ वेजेस ऍक्टची काटेकोर अंमलबजावणी करावी अशी मागणी…

जिवंत ऊस उत्पादक शेतकऱ्याला मृत दाखवून रोखले बिल

शहाजहाँपूर (उत्तर प्रदेश )- एका जिवंत शेतकऱ्याला कागदोपत्री मृत घोषित करून त्याचे उसाचे बिल रोखण्याचा भयंकर प्रकार येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणामुळे जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाने गटविकास अधिकाऱ्याला निलंबित केले आहे. ‘तुम्ही तर मेलेले आहात, त्यामुळे तुम्हाला पैसे काढता येणार…

थकित एफआरपी व्याजदर कपातीसाठी राज्याचे केंद्राला साकडे

sugarcane field

नवी दिल्ली – शेतकऱ्याना देय रास्त आणि लाभदायक किंमत (FRP) पेमेंट थकल्यास] त्यावरील व्याज 15 टक्क्यांवरून 7.5 टक्क्यांपर्यंत कमी करावे, अशी मागणी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे केली आहे. राज्याने साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) प्रति क्विंटल ₹3,100 वरून ₹3,600 पर्यंत वाढवण्याची…

स्वाभिमानीची 15 ऑक्टो. ला ऊस परिषद

कोल्हापूर- स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 21 वी ऊस परिषद जयसिंगपूर शहरातील विक्रमसिंग मैदानावर 15 ऑक्टोबर रोजी होणार आहे, अशी घोषणा अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी केली. शेट्टी म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम एकरकमी मिळावी, तीन तुकड्यांमध्ये…

थकित एफआरपी १५ टक्के व्याजासह द्या

Raju Shetti former MP

सांगली ः थकित एफआरपी रक्कम, १५ टक्के व्याजासकट दिली पाहिजे, असा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. कारखान्यांनी तो पाळावा, अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. आगामी हंगामात एफआरपीची पूर्ण रक्कम मिळाल्याशिवाय एकही कारखाना सुरू होऊ देणार नाही, असा…

Select Language »