Category मराठवाडा

अपुऱ्या पावसाचा फटका; मराठवाड्यात साखर उत्पादन घटणार?

Sugar Grade2

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात यंदा अपुऱ्या पावसामुळे उसाच्या लागवडीवर गंभीर परिणाम झाला आहे. विभागातील उसाचे सरासरी क्षेत्र सुमारे ३ लाख २४ हजार हेक्टर असताना आतापर्यंत केवळ ४३ हजार हेक्टरवर, म्हणजेच सरासरीच्या अवघ्या १४ टक्के क्षेत्रावर लागवड झाली आहे. त्यामुळे आगामी…

ऊसशेतीला आगीचे ग्रहण; दोन लाखांचे नुकसान

अंबड : तालुक्यातील वडीगोद्री शिवारात महावितरणच्या विद्युत वाहिनीतील बिघाडामुळे उसाच्या शेताला आग लागली. या दुर्घटनेत येथील शेतकरी बापूराव दादाराव काळे व त्यांच्या भावांच्या गट क्रमांक १० मधील एकूण सात एकर ऊस क्षेत्रापैकी सुमारे दोन एकर ऊस पूर्णपणे जळून खाक झाला.…

‘संत एकनाथ’च्या जप्त साखरेची विक्री करण्यास परवानगी

छत्रपती संभाजीनगर : उसाची एफआरपी थकवल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकणाऱ्या पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मोठा दणका दिला आहे. कारखान्याची जप्त केलेली १३ हजार ५८१.५० क्विंटल साखर आणि मोलॅसिस विक्री करण्यास न्यायालयाने परवानगी…

साखरेचा दर गगनाला; मग उसाला दरवाढ कधी?

शेतकरी संघटना आक्रमक: कारखान्यांसमोर नव्या दराचे आव्हान छत्रपती संभाजीनगर : काही दिवसांपासून साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात साखरेचा दर काही ठिकाणी ६० ते ७५ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर याचा थेट परिणाम होत आहे. साखरेच्या या…

गुळ पावडर उद्योगांना दिलासा; मुख्यमंत्री फडणवीस सकारात्मक

devendra fadanvis

लातूर : गुळ पावडर उद्योगांना भेडसावणाऱ्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. आमदार अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वाखालील उद्योग प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. बैठकीत उद्योगांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्‍नांवर चर्चा झाली. यामध्ये उत्पादन खर्च, बाजारपेठेतील स्पर्धा,…

ओंकार साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई

FRP of sugarcane

धाराशिव – परळी तालुक्यातील पांगरी येथील ओंकार साखर कारखान्याने २०२५-२६ गाळप हंगामातील एफआरपी (Fair and Remunerative Price) शेतकऱ्यांना पूर्णपणे न दिल्याने कारवाईचे आदेश जारी करण्यात आले आहेत. पुणे येथील साखर आयुक्तांनी या थकबाकीबाबत कठोर भूमिका घेतली असून, कारखान्याची चल-अचल मालमत्ता…

उंच उसात फवारणीचे आव्हान; ड्रोन तंत्रज्ञानाचा पर्याय

महाकाळ (ता. जालना) : अंबड तालुक्यातील महाकाळ, सुपुरी आणि परिसरातील उसाच्या पिकांवर रोग-किडीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. मावा, तुडतुडे यांसारख्या किडींचा वाढता प्रादुर्भाव आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे उसाच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. ऊस लागवडीसाठी शेतकऱ्यांनी मोठा…

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी शासकीय वसतिगृहाचे उद्घाटन

बीड : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुक्रवारी बीड येथे ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी उभारण्यात आलेल्या ‘संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहाचे’ उद्घाटन करण्यात आले. ऊसतोड कामगारांच्या कुटुंबांना रोजगारासाठी दरवर्षी स्थलांतर करावे लागते. त्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडण्याची शक्यता असते. ही…

गंगापूर कारखाना प्रकरणी उच्च न्यायालयाचा आदेश

कारखान्याच्या संचालक मंडळाला तूर्तास दिलासा छत्रपती संभाजीनगर : गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाविरुद्ध सहनिबंधक (सहकारी संस्था) यांनी प्रतिकूल आदेश दिल्यास, त्या आदेशाची अंमलबजावणी पुढील १५ दिवस करू नये, असा महत्त्वपूर्ण अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला. न्या.…

निळकंठेश्वर कारखान्याला मोठा दिलासा!

NCDC

₹18 कोटींच्या खेळत्या भांडवलाच्या कर्ज प्रस्तावाला मंजुरी लातूर / किल्लारी : औसा तालुक्यातील किल्लारी येथील श्री निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्याला आर्थिक बळकटी देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कारखान्याच्या खेळत्या भांडवलासाठी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून (NCDC) कर्ज घेण्याच्या…

Select Language »