Category राजकीय

शेतकऱ्यांची थकबाकी दीड महिन्यात चुकती करणार : टोकाई चेअरमन

tokai sugar, Vasmat

पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे २३ कोटी रुपयांचे जे काही देणे आहे, ते सर्व येत्या दीड महिन्यात चुकते करणार आहोत, अशी हमी टोकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲड. शिवाजीराव जाधव यांनी दिली आहे. वसमत येथील (जि. हिंगोली) टोकाई साखर…

भाजप नेत्याच्या ताब्यातील साखर कारखाना जप्त करण्याचे आदेश

Tokai Sugar Factory

हिंगोली : भाजप नेते शिवाजीराव जाधव हे चेअरमन असलेल्या जिल्ह्यातील टोकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई करून शेतकऱ्यांचे देणे द्यावे, असा आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. वसमत तालुक्यात हा कारखाना येतो. जानेवारी,…

‘बारामती ॲग्रो’ कारखान्याची चौकशी : सहकारमंत्री

Baramati Agro sugar

सावे – राम शिंदे यांच्यात जोरदार खडाजंगी मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या खासगी साखर कारखान्यावर कारवाई करण्यात विलंब झाल्याचा आरोप भाजप आमदार राम शिंदे यांनी विधान परिषदेत केला. यावरून शिंदे आणि सहकारमंत्री अतुल सावे यांच्यात जोरदार…

राजाराम कारखान्याच्या १८९९ जणांचे सभासदत्व वैधच

Rajaram sugar kolhapur

कोल्हापूर : येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे (कसबा बावडा) १८९९ सभासद वैधच असल्याचा निवाडा प्रादेशिक साखर सहसंचालकांनी दिला आहे. त्यामुळे अमल महाडिक – सतेज पाटील राजकीय द्वंद आणखी वाढण्याची शक्यता आहे. मतदार यादीवर दोन्ही बाजूने हरकती घेण्यात आल्या होत्या.…

माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली विजयाचा चौकार

Chandradeep Narake

कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सलग चौथ्यांदा यश मिळवून विजयाचा चौकार ठोकला. त्यांच्या नेतृत्वाखालील ‘नरके पॅनल’चे सर्व २३ उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले. सलग चौथ्यांदा सत्ता ताब्यात ठेवत कुंभी-कासारी सहकारी साखर…

अशी राहिली साखर कारखानदारी उभी…

Sharad Pawar

ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांच्या शब्दात .. (From Sakal MahaConclave) ”महाराष्ट्र साखर उद्योगाची मुहुर्तमेढ ही खऱ्या अर्थाने खाजगी क्षेत्रातील लोकांनी केली. या सर्व खाजगी भांडवलदारांनी धाडस केलं, गुंतवणूक केली. जमीनी खंडाने घेतल्या, उस लावला आणि एक महत्त्वाचं पिक घेण्यास…

सहकारी साखर कारखान्यांची संख्या दोनशेवरून शंभरवर का – अमित शाह

Amit Shah at Pune

इथेनॉल धोरणामुळे ४० हजार कोटींचा शेतकऱ्यांना लाभ पुणे : ”इंधनामध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट साध्य झाल्यामुळे ४१ हजार ५०० कोटी रूपयांचे परकीय चलन वाचले, असून त्यातील सुमारे ४० हजार ६०० कोटी रुपयांचा थेट लाभ शेतकऱ्यांना झाला आहे, अशी माहिती…

राजारामबापू कारखान्याच्या अध्यक्षपदी प्रतीक पाटील

Pratik Jayant Patil

सांगली : राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी प्रतीक जयंतराव पाटील यांची शुक्रवारी बिनविरोध निवड झाली. नूतन संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये उपाध्यक्षपदी विजयराव पाटील यांची निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत २१ संचालकांची बिनविरोध झाली होती. स्व. राजारामबापू पाटील यांनी…

कुंभी-कासारी कारखाना चौथ्यांदा चंद्रदीप नरके यांच्याकडे

Kumbhi Kasari sugar elections

कोल्हापूर : कुडित्रे येथील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ‘नरके पॅनल’चे सर्व २३ उमेदवार १५०० ते २००० मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. यानंतर चंद्रदीप नरके यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली चौथ्यांदा हे यश…

गंगापूर कारखाना निवडणुकीत आ. बंब यांच्या पॅनेलचा पराभव

Prashant Bamb-Krushna Dongaonkar

गंगापूर : गंगापूर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत आमदार प्रशांत बंब यांच्या पॅनेलचा पराभव करत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कृष्णा डोणगावकर यांच्या शिवशाही शेतकरी विकास पॅनेलने विजय मिळवला. बंब यांच्यासह त्यांच्या सर्व उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला. गंगापूर तालुक्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू…

Select Language »