राज्यात ८१ लाख टन साखर उत्पादन, गाळप हंगाम अखेर संपला

पुणे : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या परवाच्या घोषणेबरोबरच राज्यातील साखर हंगाम अखेर आटोपला असून, सुमारे ८१ लाख टन (८०.९४८) साखर उत्पादन झाले आहे. अनेक अडचणींना तोंड देत सर्वाधिक काळ चालणारा आणि विक्रमी गाळप करणारा श्री विघ्नहर कारखाना एकमेव ठरला…











