Category Headlines

imp happenings to be treated as headlines

राज्याच्या गाळप क्षमतेत दीड लाख टनांची वाढ

Daund Sugar Factory Bird View

दौंड शुगर ठरला सर्वात मोठा कारखाना पुणे : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची गाळप क्षमता (क्रशिंग कपॅसिटी) सुमारे दीड लाख टनांनी वाढली असून, दौंड शुगर हा राज्यातील सर्वात मोठा साखर कारखाना ठरला आहे. गतवर्षीचा साखर हंगाम (२१-२२) खूप चांगला गेल्याने आणि यंदासाठी…

तेरणा कारखाना भैरवनाथ शुगरकडेच राहणार

terna sugar factory

ट्वेंटीवन शुगरची याचिका फेटाळली उस्मानाबाद : मराठवाड्यातील सर्वात जुना साखर कारखाना असलेल्या ढोकी येथील तेरणा साखर कारखाना २५ वर्षांसाठी श्री भैरवनाथ शुगरकडेच राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. श्री भैरवनाथ शुगर राज्याचे आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांची…

दोन वर्षांत येणार नऊशे हार्वेस्टर, अधिवेशन संपताच अनुदानाचा निर्णय

sugarcane harvester

पुणे : केंद्र सरकारच्या कृषी विकास योजनेतून, राज्याला दोन वर्षांत ९०० ऊस तोडणी यंत्रे (हार्वेस्टर) मिळणार असून, याबाबत राज्याच्या अनुदानाचा निर्णय नागपूर अधिवेशनात किंवा अधिवेशन संपताच होण्याची शक्यता आहे. नवीन नऊशे हार्वेस्टर वाढल्यास, राज्यातील एकूण हार्वेस्टरची संख्या दीड हजारांच्या पुढे…

कोल्हापूर जिल्ह्यात अडीच हजार मुले शाळाबाह्य

AVANI NGO

ऊसतोडणी मजुरांच्या मुलांचा समावेश कोल्हापूर : लहान मुलांसाठी काम करणाऱ्या कोल्हापूर येथील ‘अवनि’ संस्थेने केलेल्या पाहणीत सुमारे अडीच हजार मुले शाळाबाह्य असल्याचे आढळून आले. त्यामध्ये ऊसतोड मजूर, साखर कारखान्यांवरील कंत्राटी मजूर, वीटभट्टीवरील कामगार यांच्या मुलांचा समावेश आहे. ‘अवनि’ सामाजिक संस्थेने…

आतापर्यंत ५.६२ लाख टन साखर निर्यात

sugar export

सर्वाधिक निर्यात यूएईला नवी दिल्ली : भारताने ऑक्टोबरमध्ये सुरू झालेल्या चालू 2022-23 मार्केटिंग वर्षात आतापर्यंत 5.62 लाख टन साखर निर्यात केली आहे, असे एआयएसटीएने मंगळवारी सांगितले. नोव्हेंबरमध्ये, सरकारने चालू (2022-23) विपणन वर्षात (ऑक्टोबर-सप्टेंबर) 60 लाख टन साखर निर्यात करण्यास परवानगी…

तोट्यात गेलेले कारखाने यापुढे कवडीमोल दराने विकू देणार नाही

devendra fadanvis

सरकार करणार खरेदी : उपमुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत माहिती नागपूर : सरकारची हिस्सेदारी असलेले; परंतु तोट्यात गेलेले कारखाने यापुढे कवडीमोल दराने विकू देणार नाही, अशी प्रतिज्ञा करताना, असे कारखाने सरकार विकत घेणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत…

‘सिद्धेश्वर’च्या समर्थनार्थ हजारो नागरिक रस्त्यावर

Solapur March

‘सिद्धेश्वर’च्या चिमणीने लावली जनतेच्या मनात आग सोलापूर : सिद्धेश्वर कारखाना वाचवण्यासाठी आणि बोरामणी विमानतळासाठी सोलापूरकरांनी सोमवारी विराट मोर्चा काढला. आजच्या या मोर्चात सिद्धेश्वर कारखाना बचाव कृती समितीतर्फे आयोजित या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले होते. आजच्या या मोर्चात काँग्रेस, शिवसेना,…

२० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल पुढील महिन्यापासून पंपांवर

Hardeep Puri in Benglore

इंजिनमध्ये बदलाची गरज नाही – पेट्रोलियम मंत्री नवी दिल्ली: भारत २० टक्के इथेनॉल-मिश्रित इंधन मार्केटमध्ये आणण्यास तयार आहे आणि ते पुढील महिन्यापासून निवडक आउटलेटवर उपलब्ध होईल, असे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले. पुरी यांनी बंगळुरूमध्ये इंडिया एनर्जी वीक…

साखरेचे शेअर तेजीत

sugar share rate

इथेनॉलवरील जीएसटीत मोठी कपात मुंबई : साखर कंपन्यांचे शेअर्स सोमवारी सलग दुसऱ्या ट्रेडिंग सत्रामध्ये 20 टक्‍क्‍यांपर्यंत वाढल्याने खासगी साखर उद्योग क्षेत्रात समाधानाचे वातावरण होते. देशांतर्गत साखर उत्पादनाचे मूल्यांकन केल्यानंतर सरकार चालू 2022-23 विपणन वर्षासाठी साखर निर्यातीचा कोटा वाढविण्याचा विचार करू…

साखर उत्पादन 5 टक्क्यांनी वाढले, ५० लाख टन निर्यातीसाठी करार

Sugar production

नवी दिल्ली : १ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर या अडीच महिन्यांच्या कालावधीत भारतातील साखर उत्पादन ५% वाढले, असून कारखान्यांनी आतापर्यंत 45-50 लाख टन साखर निर्यातीसाठी करार केले आहेत. केंद्र सरकारने मागच्या नोव्हेंबरमध्ये एका परिपत्रकाद्वारे चालू (२०२२-२३) विपणन वर्षात ६० लाख…

Select Language »