Tag sugar industry news

…तरच साखर उद्योगाचे भवितव्य उज्ज्वल होईल : मंत्री गडकरी

Nitin Gadkari

लातूर : ऊस उत्पादक शेतकऱ्याने कमीत-कमी पाणी, खत आणिउत्पादन खर्च यातून अधिक उत्पादन मिळवले पाहिजे. शेती हे एक विज्ञान आहे. उद्योग केवळ साखरेपुरता मर्यादित राहू न देता इथेनॉल, इंधन आणि हवाई इंधन याकडे कारखानदारांनी लक्ष दिले पाहिजे. शेतकरी ऊर्जादाता बनल्याशिवाय…

सांगलीतील कारखाने बंद पाडण्याचा इशारा

Raju Shetti Statement

सांगली : जिल्‍ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपी अधिक शंभर रुपये असा दर द्यायला हवा. जे कारखानदार हा दर देणार नाहीत, असे साखर कारखाने बंद पाडल्याशिवाय आम्‍ही राहणार नसल्‍याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. बुधगाव…

अशोक साखर कारखान्यात विविध पदांसाठी भरती

vsi jobs sugartoday

अहिल्यानगर : अशोक सहकारी साखर कारखान्याच्या को-जनरेशन विभागात खालील पदांसाठी अनुभवी व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आठ दिवसांच्या आत आपले अर्ज, शैक्षणिक पात्रता, वय, अनुभव इत्यादी सर्टिफिकेटसह कारखान्याचे पत्त्यावर पाठविण्याचे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले…

भीमा साखर कारखान्यामध्ये थेट मुलाखती

vsi jobs sugartoday

सोलापूर :  मोहोळ तालुक्यातील सिकंदर टाकळी येथील भीमा सहकारी साखर कारखान्यामध्ये विविध विभागांमध्ये टेक्निकल पदे भरावयाची आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी करखान्याच्या एचआर विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पदांचा तपशील खालीलप्रमाणे अ. क्र.   पदांचे नाव                      पद…

शिराळा तालुक्यात उसाच्या ट्रॅक्टरला अपघात; चालकाचा मृत्यू

शिराळा : तालुक्यातील कोकरूड येथील आटूगडेवाडीत उसाच्या ट्रॅक्टरवरील ताबा सुटून भीषण अपघात झाला. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही अपघात वाकुर्ड बुद्रुक-शेडगेवाडी मार्गावर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास झाला. श्रीपाद शिवाजी ठाकरे (वय ४०, रा. विटनेर, ता. जि. जळगाव, सध्या…

केंद्र सरकार देणार १.५ दशलक्ष टन साखर निर्यातीला परवानगी

नवी दिल्ली : केंद्रीय अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांनी नुकतीच १.५ दशलक्ष टन साखर निर्यातीला परवानगी देण्याचा निर्णय विचाराधिन असल्याचे सांगितले आहे. तसेच, शेतकऱ्यांना जलद पेमेंट मिळण्यास मदत करण्यासाठी मोलॅसिसवरील ५० टक्के निर्यात कर रद्द करण्याचाही विचार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. …

ऊसतोडणी मजूर पुरविण्याचे आमिष; १५ लाखांची फसवणूक

कागल : ऊसतोडणी मजूर पुरवतो म्हणून १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी परभणी जिल्ह्यातील एकावर कागल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विशाल नारायण पाटील (रा. बानगे,ता. कागल) यांनी कागल पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. विशाल पाटील यांना गळीत हंगामात…

गेवराई तालुक्यात तब्बल २० एकर ऊस शॉर्टसर्किटने जळून खाक

burned Sugarcane field

गेवराई : तालुक्यात तब्बल २० एकर ऊस शॉर्टसर्किटने जळून खाक झाल्‍याची घटना ८ नोव्हेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास घडली. यात १० शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्याचे जवळपास ३० लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळेचे ही घटना…

साखरेचा कोटा कमी देऊनही दरात घसरण!

मुंबई : नोव्हेंबर महिन्यासाठी साखरेचा कोटा कमी देऊनही ग्राहकांकडील खरेदी रोडावली आहे, त्‍यामुळे राज्‍यातील घाऊक बाजारपेठेत साखरेचे दर प्रति क्‍विंटलला ५० रुपयांनी घटल्‍याचे सांगण्यात आले. बाजारात एस ३० ग्रेड साखरेचा प्रति क्‍विंटलचा दर हा ४१५० ते ४२०० रुपयांनी घटून ४१०० ते…

शिरोळमध्ये ऊस वाहतूक रोखल्याने आंदोलकांवर गुन्हे

शिरोळ : राज्यातील गाळप हंगाम सुरू झाला आहे. मात्र, अद्याप काही कारखान्यांनी ऊसदर जाहीर न केल्‍याने, तसेच ऊस उत्‍पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काही अनेक ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. शिरोळ येथील घालवाड फाटा येथे शनिवारी (दि. ८) ऊस वाहतूक रोखत शिवीगाळ…

Select Language »