८५ साखर कारखाने ‘शंभर नंबरी’
पुणे : यंदाच्या ऊस गळीत हंगामाचा दुसरा टप्पा जोमात असताना, १५ जानेवारी अखेरीच्या आकडेवारीनुसार राज्यातील ८५ कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. तर ११७ कारखान्यांकडे चालू हंगामाची एफआरपी थकीत आहे. साखर आयुक्तालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.…