राज्यातील ऊसउत्पादकांसाठी ३५ लाखांचे हार्वेस्टर अनुदान

पुणे : राज्यात ऊसतोड कामगारांच्या वाढत्या टंचाईवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय कृषी यांत्रिकीकरण अभियानांतर्गत(SMAM) ९०० ऊस तोडणी यंत्रे (हार्वेस्टर) अनुदानावर देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना प्रति यंत्र तब्बल ३५ लाख रुपयांचे अनुदान दिले जात असून, आतापर्यंत राज्यातील ६०० शेतकऱ्यांनी या सुविधेचा…












