Tag sugarcane news

इथेनॉल खरेदी धोरणातील असमानता दूर करा : विस्मा

Wisma

पुणे : सरकारी तेल विपणन कंपन्यांनी (ओएमसी) इथेनॉल खरेदी करण्यासाठी टाकलेल्या अटींबाबत नापसंती व्यक्त करत, ही असमानता दूर करावी, अशी मागणी ‘विस्मा’ने (वेस्ट इंडियन शुगर मिल्स असो.) केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री आणि पेट्रोलियम मंत्र्यांकडे केली आहे. यंदाच्या हंगामात…

कुंभी-कासारी कारखान्याचा ऊस दर राज्यात सर्वाधिक

KUMBHI KASARI SSK

कोल्हापूर : कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याकडून यंदाच्या गळीत हंगामाकरिता उसाला प्रतिटन ३ हजार ३०० रुपयांप्रमाणे पहिला हप्ता दिला जाईल, अशी घोषणा कारखान्याचे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांनी केली आहे. हा राज्यातील आतापर्यंत सर्वाधिक दर आहे. आ. नरके म्हणाले, हंगाम २०२४-२५…

उसापासून निर्मित डांबराचा रस्ता, गडकरींच्या हस्ते लोकार्पण

NITIN GADKARI BIO BITUMEN ROAD

नागपूर: ऊस, धान, मका आदींच्या टाकाऊ घटकांपासून (बायोवेस्ट) डांबरी रस्त्याप्रमाणेच उत्तम रस्ता तयार करण्यात आला असून, त्याचे उद्‌घाटन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केले. नागपूर जिल्ह्यातील मनसरजवळ बांधण्यात आलेला भारतातील हा पहिला बायो-बिटुमेन निर्मित (लिग्निन टेक्नॉलॉजी) रस्ता आहे.…

सिद्धी शुगरचे चेअरमन बाबासाहेब पाटील नवे सहकारमंत्री

Babasaheb Patil, Cooperation Minister

मुंबई : साखर उद्योगाचे नियंत्रण असणाऱ्या सहकार खात्याचे नवे मंत्री म्हणून आमदार बाबासाहेब पाटील यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) अहमदपूरचे (जि. लातूर) आमदार असून, ६६ वर्षांचे आहेत. त्यांचा नुकताच म्हणजे ५ डिसेंबर रोजी वाढदिवस…

साखर कारखान्यांना चार हजार कोटींची मदत : मुरलीधर मोहोळ

Muralidhar Mohol, Central Minister

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांना मोदी सरकारकडून आतापर्यंत थेट चार हजार कोटी रुपयांचे अर्थसाह्य विविध स्वरूपात करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. लोकसभेत खा. सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांला ते शुक्रवारी…

महाराष्ट्रात १०२ लाख टन साखर उत्पादनाचा ‘विस्मा’चा अंदाज

Wisma

पुणे : महाराष्ट्रातील सध्या सुरू असलेल्या ऊस गळीत हंगामात १०२ लाख टनापर्यंत साखरेचे उत्पादन होण्याच्या अंदाज ‘विस्मा’ने (वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन) व्यक्त केला आहे.‘विस्मा’ची बैठक नुकतीच बी. बी. ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली असता साखर उत्पादनाचे सुधारित अंदाज घोषित…

इथेनॉल दरवाढ सामान्य असणार, तर खरेदीत सह. कारखान्यांनाच प्राधान्य

ETHANOL PRICE HIKE

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या अख्त्यारित असलेल्या पेट्रोलियम कंपन्यांनी इथेनॉल खरेदीसाठी सहकारी साखर कारखान्यांना प्राधान्य द्यावे, अशा सूचना सरकारने केल्या आहेत, शिवाय इथेनॉल दरवाढ प्रलंबित ठेवल्याने साखर उद्योग डोळे विस्फारून केंद्राकडे पाहात आहे. केंद्राने तेल विपणन कंपन्यांच्या (OMC) निविदा दस्तऐवजात…

ट्रॅक्टरने केला घात, गाढ झोपलेले ऊसतोड मजूर पती-पत्नी ठार

tractor accident pune

पुणे : ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर उसतोड मजुरांच्या कोपीत शिरल्याने कोपीत झोपलेले पती-पत्नी जागीच ठार झाले. निर्वी (ता. शिरूर) येथील शिवारात १६ रोजी पहाटे ही घटना उघडकीस आली. गणपत कचरू वाघ (वय ४६) आणि शोभा गणपत वाघ (वय ४१, दोघेही…

बॉयलर बिल 2024 चा गोषवारा

W R Aher article on new Boiler Bill 2024

राज्यसभेत मांडलेले बॉयलर विधेयक, 2024बॉयलर बिल 2024 चा गोषवारा:सर्व गैर-गुन्हेगारी प्रकरणांमध्ये( Penalty’)’दंड'( नियम किंवा कायद्याचे पालन न केल्याबद्दल शिक्षा म्हणून भराव्या लागणाऱ्या ‘दंडाची रक्कम) ‘दंड(‘ fine) मध्ये बदलला. 7 पैकी 3 गुन्ह्यांना गुन्हेगार ठरवले, बॉयलरची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी विधेयक बॉयलर…

ओंकार साखर कारखाना 2800 रू. पहिला हप्ता देणार : बाबुराव बोत्रे

Baburao Botre Patil

सोलापूर : ओंकार साखर कारखाना चांदापुरी युनिट एक 2024 व 2025 या सिझन मध्ये येणाऱ्या ऊसास पहिला हप्ता एक रक्कमी 2800/- रुपये प्रतिटन देणार असुन उर्वरीत बैल पोळ्यासाठी रु.100/- व दिपावली सणासाठी रु.100 /- देणार असुन फेब्रुवारी मध्ये येणाऱ्या ऊसास…

Select Language »