Author 1

Author 1

इंधन दरवाढीचा फटका; महागाई पुन्हा वाढीच्या मार्गावर

Petrol - Diesel new rate

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या वाढीमुळे देशातील महागाई निर्देशांकावर थेट परिणाम झाला आहे. ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) सुमारे ७.५७ टक्क्यांपर्यंत वाढल्याची माहिती अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दिली. इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे वाहतूक, अन्नधान्य, भाडे, कपडे आणि…

ऊस बिलासाठी स्वाभिमानींचा तिरडी मोर्चा

आश्वासनानंतर आंदोलन स्थगित माढा : श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्याकडील थकीत ऊस बिलाच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तिरडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून काढण्यात येणार होता. मात्र, मोर्चापूर्वीच कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांशी चर्चा…

उसबिलांची ३५८ कोटींची थकबाकी

सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सोलापूर : जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जात आहेत. जाहीर करण्यात आलेल्या एफआरपी दरानुसार साखर कारखान्यांनी देय असलेली सुमारे ३५८ कोटी रुपयांची उसबिले अद्याप थकीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले…

ऊसशेतीत डिजिटल क्रांती; एआयचा वाढता वापर!

पुणे : बदलत्या हवामानाचा ऊस उत्पादनावर होत असलेला परिणाम, पाण्याची टंचाई आणि खर्चात वाढ या पार्श्वभूमीवर ऊसशेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यावश्यक झाले आहे. योग्य व्यवस्थापन, खतांचा समतोल वापर आणि पाण्याचे नियोजन यामुळे उत्पादनात वाढ साधता येऊ शकते,…

नदीकाठावर गाळ सोडला; साखर कारखान्यावर गुन्हा

पुणे : आंबेगाव तालुक्यातील पारगाव परिसरातील अवसरी येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून (ईटीपी) गाळ परवानगीशिवाय बाहेर सोडून परिसर प्रदूषित केल्याप्रकरणी कारखान्याचे ठेकेदार व एका कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे…

साखर उद्योगाला चालना देण्यासाठी धोरणात्मक बदल आवश्यक !

अहिल्यानगर : कोपरगाव येथे आयोजित साखर उद्योगाशी संबंधित कार्यक्रमात तज्ज्ञांनी साखर विक्री व्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज अधोरेखित केली. साखरेसोबत निर्माण होणाऱ्या उपपदार्थांना योग्य दर मिळत नसल्यामुळे कारखान्यांची आर्थिक स्थिती कमकुवत होत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. त्यामुळे उपपदार्थांच्या खरेदी दरात…

साखर क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. सुरेश भोसले सन्मानित

Dr. Suresh Bhosale

सातारा : जिल्ह्यातील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘साखर उद्योग गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. साखर उद्योगातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट्स असोसिएशनच्या वतीने हा प्रतिष्ठित पुरस्कार दिला जातो .साखर उद्योग…

मद्य उद्योगात मोठा घोटाळा उघडकीस!

दिशाभूल करणारे लेबलिंग, अनधिकृत फ्लेवर्सचा वापर; सहा कंपन्यांना नोटीस नवी दिल्ली: देशातील काही मद्य उत्पादक कंपन्यांकडून ग्राहकांची दिशाभूल करणारे लेबलिंग आणि अनधिकृत फ्लेवर्सचा वापर केल्याचे गंभीर प्रकार समोर आले आहेत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) यांच्या तपासणीत या…

तुळजाई शुगरमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

vsi jobs sugartoday

धाराशिव : जिल्ह्यातील हावरगांव (ता. कळंब) येथील तुळजाई शुगर इंडस्ट्रीज प्रा. लि. यांनी विविध विभागांतील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्पासाठी पात्र व अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपल्या कामाचा अनुभव, शैक्षणिक…

रानडुकरांच्या हल्ल्याने उस शेती धोक्यात!

तीस गुंठे उस पिकाची नासधूस; दोन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान कन्नड : विटा व खानापूर तालुक्यातील परिसरात रानडुकरांचा उपद्रव पुन्हा एकदा वाढल्याचे समोर आले आहे. रात्रीच्या वेळी शेतात घुसून रानडुकरांनी उसाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या घटनेत सुमारे ३०…

Select Language »