ब्लॉग

‘जयभवानी’च्या चेअरमनपदी अमरसिंह पंडित

Jaibhawani Sugar election

गेवराई : जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अमरसिंह पंडित यांची, तर व्हाइस चेअरमन पदी भाऊसाहेब नाटकर यांची बिनविरोध निवड झाली. या कारखान्यावर लिपिक म्हणून नोकरीस लागलेले नाटकर त्याच कारखान्याचे उपाध्यक्ष झाल्याने त्यांना भावना अनावर झाल्या. सभासदांनी टाकलेला विश्वास सार्थ करण्यासाठी…

‘केदारेश्वर’च्या अध्यक्षपदी ऋषिकेश ढाकणे, उपाध्यक्षपदी काटे

Kedareshwar Sugar dhakane

अहिल्यादेवीनगर : संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे श्री केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी ऋषिकेश प्रतापराव ढाकणे यांची, तर उपाध्यक्षपदी माधवराव भिवसेन काटे यांची बिनविरोध निवड झाली. केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक मागील महिन्यात बिनविरोध झाली. कारखाना कार्यस्थळावर अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी नवीन संचालक…

किल्लारी कारखाना चार लाख टन गाळप करणार : आ. अभिमन्यू पवार

Mla Abhimanyu Pawar

औसा: किल्लारी कारखाना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे आणि कारखान्याला पुन्हा गतवैभव मिळवून देणे हे मोठं आव्हान असले तरी ते आव्हान मी स्वीकारले आहे. पुढील गळीत हंगामात ४ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दीष्ट आम्ही ठेवले असून व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून…

अशोक देवरे यांचे निधन

Ashok Deore, Vithewadi

नाशिक : वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना (विठेवाडी) कामगार युनियनचे अध्यक्ष अशोक देवरे यांचे नुकतेच निधन झाले. कारखाना आणि कामगारांच्या हितासाठी सातत्याने प्रयत्न करणारे कामगार नेते म्हणून त्यांची ओळख आहे. ‘शुगरटुडे’च्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली.

‘ज्यूस क्लॅरिफिकेशन’साठी नव्या तंत्रज्ञानाचे सादरीकरण

DSTAI Seminar

‘डीएसटीएआय’च्या चर्चासत्राला मोठा प्रतिसाद पुणे : ‘ज्यूस क्लॅरिफिकेशन टेक्नॉलॉजीज फॉर इम्प्रूव्हिंग शुगर/इथेनॉल क्वालिटी’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात तंत्रज्ञांनी नव्या तंत्रज्ञानाचे सादरीकरण केले. त्यामुळे नजीकच्या भविष्यात साखर आणि इथेनॉलची गुणवत्ता आणखी वाढण्याची आशा निर्माण झाली आहे. डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ…

‘रामेश्वर’चे १८ संचालक बिनविरोध

Rameshwar sugar

जालना : भोकरदन तालुक्यातील रामेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २१ जागांसाठी केवळ २३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या निवडणुकीत विरोधकांनी उमेदवारी अर्जच दाखल केले नाहीत. त्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या गटाच्या १८…

‘गणेश’ निवडणुकीत विखेंना धक्का

Ganesh sugar elections

19 पैकी 18 जागांवर थोरात-कोल्हे गट विजयी राहाता : राहुरी पाठोपाठ गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने पराभवाचा धक्का दिला आहे.विखे-पाटील यांच्या…

मकाई कारखान्यावर बागल पॅनलचे वर्चस्व

Makai Sugar election

सोलापूर : श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे निवडणुकीत लोकनेते दिगंबरराव बागल पॅनलने पुन्हा सत्ता मिळवत वर्चस्व कायम राखले आहे. विरोधी पॅनल मकाई परिवर्तन आघाडीला एकही जागा मिळवता आली नाही. बागल पॅनलचे यापूर्वी आठ उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. करमाळा तालुक्यातील…

‘सहकार शिरोमणी’चा गड कल्याणराव काळे यांनी राखला

SAHKAR SHIROMANI SUGR

सोलापूर : सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळासाठी अत्यंत चुरशीच्या वातावरणात अटतटीची निवडणूक झाली. कल्याणराव काळे यांनी कारखान्यावरील सत्ता कायम राखली. प्रारंभिक माहितीनुसर त्यांच्या नेतृत्वाखालील सहकार शिरोमणी वसंतदादा शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार दीड ते दोन हजार मताधिक्क्यांनी…

हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणीसाठी एकसमान दर हवा

Harvester Association

साखर आयुक्तांकडे ऊस तोडणी मशीन मालक संघटनेची मागणी पुणे : हार्वेस्टरद्वारे ऊसतोडणीसाठी राज्यात एकसमान ऊस तोडणी दर देण्यात यावा, अशी मागणी राज्य ऊस तोडणी मशीन मालक संघटनेने साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे केली आहे. संघटनेचे अध्यक्ष उमेशचंद्र पाटील (कोल्हापूर)…

माहेर माझे बाष्पके संचालनालय

Boiler

रविवारची साखर कविता जुने जाणते तंत्र विशारद अन्‌ सल्लागार ।जणु आहेत ते विश्वकर्मा व्यास पराशरघेती बाष्पक नियमांची परीक्षा कठोर।। घडविती अभियंते बंधु आणि परिचर ।पालन करिती माझे जसा सखा जीवाचा।। मी बाष्पक , उपासक ऊर्जाशक्तीचा।धरणीवर अवतार मी तंत्रशक्तीचा ।। भट्टीत…

राजेंद दादा पवार (वाढदिवस)

rajendra pawar

शरयू ॲग्रो इंडस्ट्रीजचे चेअरमन, बारामती ॲग्रो लि. चे चेअरमन, साखर उद्योग क्षेत्रात भरीव योगदान देणारे व्यक्तिमत्त्व कृषिरत्न राजेंद्र पवार ऊर्फ दादा यांचा १७ जून रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना शुगरटुडे परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा! कृषी क्षेत्र आणि कृषी शिक्षण क्षेत्रात…

एकरकमी एफआरपीसाठी कायदा

Raju Shetti at Varsha

राजू शेट्टी यांची माहिती मुंबई : येत्या आठवड्यात ऊस दर नियंत्रण समितीची स्थापना करून, दोन टप्यातील एफआरपीचा कायदा मागे घेऊन एफआरपी एक टप्प्यात करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र…

सल्फरविरहित साखरेसाठी नवे प्रयोग

Sulphur free sugar

पुणे : सल्फरविरहित साखर उत्पादन करण्यासाठी नवे प्रयोग सुरू आहेत. त्यालाही चांगले यशही मिळत आहे, अशी माहिती निवृत्त साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. साखरेचा शरीराची ऊर्जा राखण्यासाठी किंवा त्वरित ऊर्जेचा स्रोत म्हणून, शिवाय प्रिझर्व्हेटिव्ह म्हणूनही साखरेचा प्रचंड वापर होते.…

‘सिद्धेश्वर’च्या चिमणीचा अखेर बळी गेला!

Siddheshwar chimney

सोलापूर : श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीचा वाद बळावला आणि पुढे राजकीय वळणे घेत, अखेर चिमणीचा बळी गेला. चिमणी तर जमिनीवर आली, आता विमाने कधी उडणार याची प्रतीक्षा राहणार आहे. या साऱ्या प्रकरणात मध्यम मार्ग काढण्याचा किंवा नवा उपाय शोधण्याचा…

हवाई अंतर अट शिथिल करण्याबाबत समिती

sugar factory

मुंबई, दि.१५:- साखर कारखाना उभारणीसाठी २५ किलोमीटर हवाई अंतराची अट शिथील करण्याबाबत समिती नियुक्त करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. राज्यातील शेतकरी, ऊस वाहतूकदार तसेच सरपंच परिषद यांच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री…

शेतकरी कंपन्यांकडून इथेनॉल निर्मितीसाठी धोरण आणणार

Ethanol Blending in Petrol

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय मुंबई :- शेतकरी कंपन्यांना (एफपीओ) इथेनॉल निर्मितीसाठी परवानगी देण्याबाबत उद्योग विभागाकडून धोरण निश्चित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. राज्यातील शेतकरी, ऊस वाहतूकदार तसेच सरपंच परिषद यांच्या विविध मागण्यांबाबत…

नऊ महिन्यात उभारला माळरानावर साखर कारखाना

Dr. Shivajirao Kadam

विमानाने आणले स्पेअर, प्रसंगी घर ठेवले तारण: डॉ. शिवाजीराव कदम यांची विशेष मुलाखत१५ जून रोजीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिक्षण क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी करणारे, तसेच जीवनाच्या प्रत्येक छटेला अधिक रंगतदार, अभिरूची संपन्न बनवणारे, विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, पुण्यात फार्मसीची मुहूर्तमेढ रोवणारे,…

योग्य नियोजन केल्यास ‘शून्य टक्के मिल बंद तास’ शक्य : आहेर

W R Aher at Shri Shri sugar

सांगली : साखर उद्योगातील मान्यवर सल्लागार आणि डीएसटीए पुणेचे संचालक श्री. वा. र. आहेर यांचे “एकच ध्यास, एकच ध्यास, शून्य टक्के मिल बंद तास” या संकल्पनेची अंमलबजावणी या विषयावरील व्याख्यान सद्गुरू श्री श्री साखर कारखाना लि. राजेवाडी (जि. सांगली) येथे…

मंडलिक कारखाना दुसऱ्यांदा बिनविरोध

Mandlik sugar result

कोल्हापूर : लोकनेते सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक दुसऱ्यांदा बिनविरोध झाली. खासदार संजय मंडलिक यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यात त्यांना यश आले. त्यामुळे सभासदांचे कोट्यवधी रुपये वाचले. उत्पादक गटातून खासदार संजय मंडलिक, संभाजी मोरे, तुकाराम ढोले, बोरवडे-आनंदा…

उदगिरी शुगरचे उद्दिष्ट ७ लाख टन गाळपाचे : डॉ. राहुल कदम

UDGIRI SUGAR

२०२३-२४ गळीत हंगामाच्या मिल रोलरचे पूजन सांगली : उदगिरी शुगरच्या २०२३-२४ च्या हंगामासाठी एकूण ७ लाख टन ऊस गाळप करणार आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष डॉ. राहुल कदम यांनी दिली. कारखान्याच्या २०२३-२४ गळीत हंगामाच्या मिल रोलरचे पूजन माजी आमदार मोहनराव…

DSTAI चे 19 जूनला पुण्यात चर्चासत्र

DSTAI pune

पुणे : “साखर – इथेनॉल गुणवत्ता सुधारण्यासाठी ज्यूस शुद्धीकरण तंत्रज्ञान” या विषयावर डीएसटीएआयच्या (डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टस्‌ असो. ऑफ इंडिया) वतीने संस्थेच्या पुण्यातील सभागृहात येत्या १९ जून रोजी एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या सेमिनारला उपस्थित राहण्यासाठी ‘डेलिगेशन फी’…

प्रेमगीत

aher poem

प्रेम म्हणजे काय असतंदुसरं तिसरं काही नसतंतुमचंआमचं सारखचंअसतंम्हणून म्हणतो प्रेमगीत गावे.।। धृ।। प्रेम लहानपणी बागेत,गच्चीवर,कॅन्टीनमध्ये,सहलीत अनुभवलंसुरवंटाच फूलपाखरू झालंकळी उमलली,फूल जहालंम्हणून म्हणतो प्रेमगीत गावे.।।1।। प्रेमासाठी शाळा काॅलेजात,नाटक सिनेमात,रूसणं फुगणं ,मौजमजा,मस्ती केलीप्रेमाचे इशारे झाले,विरहाचे कढ सोसलेम्हणून म्हणतो प्रेमगीत गावे.।।2।। पुढे डिग्री मिळाली,आणाभाका…

शंभर कोटींचे कर्ज देतो म्हणून ३० लाखांची फसवणूक

vitthal corporation

सोलापूर : गुजरात येथील युनिव्हर्सल कंपनीने शंभर कोटींचे कर्ज देतो म्हणून विठ्ठल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडून ३० लाख रुपये प्रोसेसिंग फी घेऊन कर्ज किंवा प्रोसेसिंग फी परत न करता फसवणूक केली आहे. याप्रकरणी बडोदा येथील युनिव्हर्सल कंपनीचे जिग्नेश प्रवीणभाई कुरुंदाळे, जिग्नेश…

Select Language »