राज्यातील ९२ कारखान्यांकडून अद्याप ‘एफआरपी’ नाही : अजित पवार

बारामती : साखर आयुक्तांच्या आकडेवारीनुसार राज्यातील तब्बल ९२ साखर कारखान्यांकडून अद्याप ८६४ कोटी रुपये ‘एफआरपी’पोटी शेतकऱ्यांना येणे बाकी आहे, त्यामुळे २० साखर कारखान्यांवर ‘आरआरसी’ कारवाई करीत साखर ताब्यात घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ते बारामतीत पत्रकारांशी बोलत होते.…










