करवीरमध्ये उसाला आग : २०० शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर

करवीर : गुरुवारी दुपारी १:३० च्या सुमारास वडकशिवाले येथील शिवारात आग लागल्याची दुर्घटना घडली. बाचणी रस्त्यावरील स्मशानभूमीपासून सुरू झालेली आग वाऱ्यामुळे वेगाने पसरली. स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी उसाचा पट्टा तोडून आग थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत ११० एकर ऊस जळाला…












