ब्लॉग

इथेनॉलप्रश्नी तोडगा निघण्याची आशा : संजय खताळ

Sanjay Khatal IAS

ऊस रस/शुगर सिरपपासून होतो ५८ टक्के इथेनॉल पुरवठा पुणे : उसाचा रस आणि शुगर सिरपपासून इथेनॉल उत्पादन करण्यावर या हंगामासाठी बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असला, तरी साखर उद्योगाचे नुकसान होऊ नये म्हणून व्यवहार्य तोडगा काढणे शक्य आहे, अशी…

इथेनॉल : ‘विस्मा’ची पुण्यात तातडीची बैठक

Wisma

पुणे : केंद्र सरकारने इथेनॉल उत्पादनाविषयी गुरुवारी जारी केलेल्या आदेशावर चर्चा करण्यासाठी वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (विस्मा) शुक्रवारी (८ डिसेंबर) तातडीची बैठक बोलावली आहे. ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी सांगितले की, या बैठकीत केंद्र सरकारच्या आदेशावर सविस्तर चर्चा…

साखर महासंघाने पंतप्रधानांकडे मागितली दाद : प्रकाश नाईकनवरे

Prakash Naiknaware

नवी दिल्ली : इथेनॉलबाबत केंद्र सरकारने ७ डिसेंबर २०२३ रोजी जारी केलेल्या आदेश नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लि.ने (राष्ट्रीय साखर महासंघ) अमान्य केला असून, त्वरित पंतप्रधानांकडे दाद मागून आदेश रद्द करण्याची विनंती केली आहे. यंदा देशांतर्गत साखर उत्पादन…

इथेनॉल उत्पादनासाठी ऊस रसाचा वापर करण्यास यंदा बंदी

Ethanol

नवी दिल्ली : यंदा साखर कारखान्यांनी इथेनॉल उत्पादनासाठी उसाचा रस किंवा शुगर सिरपचा वापर करू नये, असा आदेश केंद्र सरकारने आज (गुरुवार) जारी केला आहे. साखरेचा देशांतर्गत पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आणि किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.…

“रिलायन्स” प्रेस मडच्या शोधात, अनेक कारखान्यांशी चर्चा सुरू

Mukesh Ambani RIL

मुंबई – भारतातील अग्रगण्य उद्योग समूह रिलायन्स इंडस्ट्रीजला (RIL) मोठ्या प्रमाणावर ‘प्रेस मड’ हवा आहे. त्यासाठी कंपनी देशातील अनेक साखर कारखान्यांशी चर्चा करत आहे. ‘प्रेस मड’ चा उपयोग कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) तयार करण्यासाठी होतो. कंपनीच्या अंतर्गत स्त्रोतांचा हवाला देत इकॉनॉमिक…

यूपीतील ऊस उत्पादकाना ‘ड्रिप’साठी 85 टक्के अनुदान

Yogi Adityanath UP

लखनौ- उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जागतिक बँक शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन प्रकल्पांच्या उभारणीच्या खर्चाच्या ८५ टक्के अनुदान देईल. याशिवाय उर्वरित १५ टक्के खर्च खासगी साखर कारखानदार शेतकऱ्यांना देणार आहेत. यासाठी योगी सरकारने पुढाकार घेतला आहे. त्याची वसुली…

‘बिद्री’त के. पीं.च्या सत्ताधारी आघाडीचा दणदणीत विजय

K P Patil Bidri sugar

कोल्हापूर: मंत्री हसन मुश्रीफ,आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार के पी पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री महालक्ष्मी शेतकरी आघाडीने यांनी विरोधी परिवर्तन पॅनलचा फडशा पाडत कागल तालुक्यातील बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्यांवर आपली सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवले. सर्व…

‘येडेश्वरी’कडून रू. २७५० शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

Bajrang Bappa Sonwane

बीड : केज तालुक्यातील आनंदगाव सारणी येथील येडेश्वरी साखर कारखान्याने गळित हंगाम २०२३- २४ मध्ये गाळपास आलेल्या ऊसाचा पहिला हप्ता प्रती टन २७५० रूपयांप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला. या कारखान्याने नेहमीच ईतर कारखान्यांच्या तुलनेत ऊसाला अधिक भाव दिला आहे. १…

‘श्री विघ्नहर’कडून रू. २७०० ची पहिली उचल जमा

Satyashil sherkar

यंदाही चांगला दर देणार : चेअरमन सत्यशील शेरकर पुणे : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना गळीत हंगाम २०२३- २४ मध्ये गाळपास येणाऱ्या उसाला मागील वर्षाप्रमाणे चांगला दर देणार आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांनी विचलित न होता सर्वाधिक ऊस विघ्नहर कारखान्याला गाळपास…

जयंतरावांना राजू शेट्टींचा इशारा

कोल्हापूर : सांगली जिल्ह्यात चार कारखाने जयंत पाटील यांचे स्वत:चे, मोहनराव शिंदे व विश्वासराव नाईक चिखली व क्रांती कुंडल हे जयंत पाटलांच्या इशार्‍यावर चालणार्‍या सहकारी मित्रांचे, 4 कारखाने आ. विश्वजीत कदम यांचे म्हणजे जवळपास 16 पैकी 11 कारखाने हे जयंत…

११0 रुपयांची वाढ फेटाळली, पंजाबचे शेतकरी संतप्त

Panjab farmers' protest

चंडीगड : पंजाब सरकारने जाहीर केलेली प्रति टन ११० रुपयांची ऊस दरवाढ शेतकऱ्यांनी फेटाळली असून, आंदोलन तीव्र केले आहे. ‘गुड न्यूज’ देतो म्हणून सरकारने आमचा विश्वासघात केला, अशा संतप्त भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. मुकेरियन साखर कारखान्यासमोर आज दुसऱ्या दिवशीही…

व्यथा बळीराजाची

Farmer

काय मी सांगु तुला आजमाझीच मला वाटे लाजअरे शेतकरी मी कोरडवाहूबंधा-याचं स्वप्न कशाला पाहू… ऐकत निळवंड्याच्या गोष्टीआज मी गाठली एकसष्टीविकासाची उलटी गटारगंगाजनसामान्य झाला नंगा… पोरांनां शहराचा सोसअहो गावं पडली ओसगावात माणसं राहिनाशहरात आसरा मिळेना…. बुढ्याला पोरांच्या लग्नाची चिंतात्याची गालफडं बसली…

राजारामबापू कारखान्याचे गाळप बंद पाडले

Rajaram bapu sugar protest

‘स्वाभिमानी’चे आंदोलन अखेर १० पर्यंत स्थगित सांगली : कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणे ऊस दराचा फॉर्म्युला मान्य करा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर येथील राजारामबापू साखर कारखान्यात काटा बंद आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी गव्हाणीत अचानकपणे उड्या…

साखर घोटाळा : पद्मसिंह पाटील, कै. पवनराजे यांची निर्दोष मुक्तता

Terana Sugar Scam

धाराशिव : ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथील कथित साखर घोटाळा प्रकरणी कारखान्याचे तत्कालीन चेअरमन पवनराजे निंबाळकर (सध्या हयात नाहीत), माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह अन्य आरोपींची धाराशिव येथील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. 2002 साली सीआयडीने…

‘भोगावती’ च्या चेअरमनपदी पाटील, उपाध्यक्षपदी कवडे

Bhogawati Sugar new Chairman

कोल्हापूर : परिते (ता.करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी काँग्रेसचे प्रा. शिवाजीराव आनंदराव पाटील, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे राजाराम कवडे यांची बिनविरोध निवड झाली. शुक्रवारी या निवडीसाठी नवनिर्वाचित संचालक मंडळाची सभा झाली. अध्यक्षस्थानी निवडणूक अधिकारी निलकंठ करे होते. कारखान्यात काँग्रेसचे…

भीमा पाटस कारखाना देणार ३ हजार रु पहिला हप्ता

Bhima Patas Sugar

पुणे : भीमा पाटस कारखान्याने चालु गळीत हंगामाच्या गाळपासाठी येणाऱ्या ऊसाला पाहिला हप्ता ३००० रूपये देण्याचा निर्णय घेतला आहे. एम आर एन ग्रुपचे अध्यक्ष मुर्गेश निरानी यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेतला असून आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाणार…

… आणि नऊ हजार रुपयांत मी झालो इंजिनिअर!

W R AHER

– वाळू रघुनाथ आहेर, नाशिक (लेखक साखर उद्योगातील नामवंत सल्लागार आहेत.)९९५८७८२९८२ (श्री. वा. र. आहेर यांनी त्यांच्या शैक्षणिक करिअरविषयी लिहिलेला हा लेख वाचनीय आणि तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे. ‘शुगरटुडे’च्या वाचकांसाठी आम्ही प्रसिद्ध करत आहोत.) मित्रहो, मे १९७४ च्या शेवटच्या सोमवारी…

ट्वेन्टी वन शुगर्सचे एक लाख मे. टन ऊस गाळप

Twenty One Sugar

लातूर : प्रतिनिधी- टवेन्टिवन शुगर्स लि. मळवटी येथील कारखान्याने ऊस गाळपात आघाडी घेऊन अवघ्या २७ दिवसात १ लाख मे. टन पेक्षा अधिक ऊसाचे गाळप केले आहे. तर शुभ्रदाणेदार १ लाख ८० हजार साखर पोत्याचे ऊत्पादन केले आहे. या हंगामात विकासरत्न…

सहकारमंत्र्यांचा कारखाना देणार रू. २९५० पहिली उचल

Dilip Walse Patil

पुणे : सहकारमंत्री व कारखान्याचे संस्थापक-संचालक दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये उसाला पहिली उचल २९५० रुपये प्रतिटनाप्रमाणे देण्याचा निर्णय घेतला आला. कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी याबाबत माहिती दिली. पारगाव (ता. आंबेगाव)…

श्री दत्त इंडियाचा ३१०० दर

Sugarcane FRP

सातारा : फलटण येथील श्रीदत्त इंडिया साखर कारखाना २०२३-२४ हंगामामध्ये गाळपास आलेल्या उसाला प्रति टन ३१०० रुपये दर देणार असल्याची माहिती कारखान्याचे मुख्य प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप यांनी दिली. चार वर्षापासून श्री दत्त इंडिया साखर कारखाना आपल्या अचूक वजन काटा…

निवृत्तीनंतर शेतीत रमणार : साखर संचालक भोसले

Dr. Sanjaykumar Bhosale

राजकारणाचाही विचार करण्याचे पृथ्वीराज चव्हाण यांचे आवाहन पुणे : प्रशासकीय सेवेत तब्बल २८ वर्षे सेवा बजावल्यानंतर मी शेती आणि सामाजिक कामांसाठी स्वत:ला वाहून घेणार आहे, असे प्रतिपादन साखर संचालक डॉ. संजयकुमार भोसले यांनी केले. कॉम्पिटिटर्स फाउंडेशनच्या वतीने संसदरत्न दिवंगत खासदार…

‘शुगरटुडे’च्या दिवाळी अंकाचे पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन

SugarToday Diwali Spl Issue

पुणे : साखर आणि सहकार क्षेत्राला समर्पित ‘शुगरटुडे’ मॅगेझीनच्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी मंत्री रजनीताई सातव, साखर संचालक डॉ. संजयकुमार भोसले, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर, विशेष पोलिस महानिरीक्षक संजय…

‘व्हीएसआय’ साखर परिषद १२ जानेवारीपासून

VSI International Sugar Conference

पुणे : येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये (व्हीएसआय) तिसरी आंतरराष्ट्रीय साखर परिषद १२ ते १४ जानेवारी २०२४ या कालावधीत होत आहे. या निमित्ताने जगभरातील साखर क्षेत्रातील प्रगतीची अनुभूती मिळणार आहे. या काळात भव्य साखर प्रदर्शनाचेही आयोजन केले आहे. साखर उद्योगासाठी राज्यात…

‘मांजरा समूहा’च्या सात कारखान्यांचे ५.४९ लाख टन ऊस गाळप

manjara sugar group

लातूर- विलासराव देशमुख मांजरा साखर समूहातील लातूर जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांनी २०२३-२४ चालू हंगामात २७ नोव्हेंबर अखेर ५ लाख ४८ हजार ८६९ मेट्रिक टन उसाचे यशस्वी गाळप केले असून त्यात परिवारातील मांजरा, रेणा, जागृति, विलास १, विलास २, मारुती महाराज,…

Select Language »