Category Headlines

imp happenings to be treated as headlines

उसाची कमतरता जाणवण्याची शक्यता; कारखान्यांसमोर आव्हान

Sugarcane co-86032

पुणे : राज्यातील आगामी ऊस गाळप हंगामासाठी साखर कारखान्यांची तयारी सुरू झाली आहे. यंदा १५ ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार साखर आयुक्तालयाच्या ऑनलाइन प्रणालीवर आतापर्यंत १२७ साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी प्रस्ताव दाखल केले आहेत.यामध्ये ६६…

सणासुदीत साखरेचे दर घसरले; क्विंटलमागे २०० रुपयांची घट

Sugar Production

पुणे : बाजारात साखरेची मागणी अपेक्षेप्रमाणे वाढलेली नसल्याने दरांवर दबाव निर्माण झाला आहे. मंगळवारी एस-३० ग्रेड साखरेचा घाऊक दर क्विंटलमागे सुमारे २०० रुपयांनी घसरून ४,८०० रुपयांपर्यंत आला. मुबलक कोट्यामुळे आगामी काळात दर आणखी कमी होण्याची शक्यता बाजारपेठेतील सूत्रांकडून व्यक्त केली…

साखर दरवाढ : अनिल घनवट यांच्या लेखाला दिलीप पाटील यांचे मुद्देसूद उत्तर

sugar production increase

शेतकरी नेते घनवट यांनी एका दैनिकात लिहिलेल्या लेखात दरवाढीला ethanol कारणीभूत असल्याचे म्हटले होते , मात्र पाटील यांनी ते खोडून काढले आहे. – काय आहेत दावे आणि त्यामागील खरी वस्तुस्थिती E20 इथेनॉल धोरणामुळे साखरेचे संकट निर्माण झाले आहे हा दावा…

साखर उद्योगाला दिलासा : सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यातील कोटा जाहीर!

Stock limit for sugar

पुणे : केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यासाठी देशभरातील साखर कारखान्यांना एकूण १३.५० लाख टन साखरेचा कोटा जाहीर केला आहे. या निर्णयामुळे बाजारातील साखर पुरवठा सुरळीत राहणार असून दरांमध्ये स्थिरता येण्याची अपेक्षा आहे. कोल्हापूरसह महाराष्ट्रातील अनेक कारखान्यांना या कोट्यातून वाटा…

ऊस गाळपाच्या पूर्वतयारीसाठी कारखान्यांना ७३८ कोटी

sugar factory

मुंबई : ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांना दिलासा देण्यासाठी राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना २०२५-२६च्या गाळप हंगामातील थकीत एफआरपीची रक्कम अदा करण्यासाठी तसेच २०२६-२७च्या गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी ७३८ कोटी ५१ लाख रुपयांचे सॉफ्ट लोन देण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात…

साखर दरवाढ : इथेनॉल नव्हे तर ही आहेत मुख्य कारणे

Sulphur and sugar

पुणे – गणेशोत्सव आणि दिवाळीसारख्या सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या दरात झालेली वाढ सर्वसामान्यांच्या किचनचे बजेट कोलमडवणारी ठरली आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात किरकोळ बाजारात साखरेचे दर प्रति किलो ४८-४९ रुपयांवरून थेट ५५ ते ६५ रुपयांवर आणि काही ठिकाणी ७० रुपयांपर्यंत पोहोचले.…

१५ ऑक्टो.ला कारखाने सुरू करण्याचे अर्थकारण: वेळेआधी गाळप की आर्थिक शहाणपण?

sugarcane Crushing season

वा. र. आहेर (नाशिक) साखर कारखान्यांचा गाळप हंगाम कधी सुरू करायचा, हा महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. १५ ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचा निर्णय वरवर पाहता शेतकऱ्यांच्या हिताचा आणि उद्योगाला गती देणारा वाटतो. मात्र या निर्णयाचे आर्थिक परिणाम…

महाकाली : बंद कारखान्याच्या चुरशीच्या निवडणुकीत सगरे पॅनलचा मोठा विजय

Mahakali Sugar Elections

अनिता सगरे गटाचे एकछत्री वर्चस्व; विरोधकांचा धुव्वा उडवत सर्व १७ जागांवर विजय सांगली : शुगरटुडेकवठेमहांकाळ येथील महांकाली सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी अनिता सगरे पॅनेलने एकतर्फी विजय मिळवला आहे. विरोधी ‘कारखाना बचाव पॅनेल’चा पूर्ण पराभव करत सत्ताधारी गटाने संचालक…

राष्ट्रीय साखर पुरस्कारांत महाराष्ट्राचा डंका; ७७ पैकी २१ पुरस्कार

sugar industry new rules

नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने जाहीर केलेल्या राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. दोन वर्षांतील एकूण ७७ पुरस्कारांपैकी तब्बल २१ पुरस्कार पटकावत महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. पुरस्कारांचे वितरण २२ सप्टेंबर…

१६ लाखावर भारतीय वंशाच्या लोकांचा द.आफ्रिकेच्या प्रगतीसाठी हातभार

शर्करायन मंगेश तिटकारे ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग.या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला,लोकांचे जीवनमान सुधारले.या उद्योगाचा इतिहास,आव्हाने,दीर्घकालीन आणि लघुकालीन उपाययोजना,उद्योगाच्या अपेक्षा इ.मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे माजी एमडी,माजी साखर सहसंचालक,अभ्यासू अधिकारी आणि साखर क्षेत्रावरील अनेक पुस्तकांचे लेखक…

Select Language »